होर्डिंग लावणार्‍या कंपनीच्या मालकाचे उद्धव ठाकरेंशी कनेक्शन

    दिनांक :14-May-2024
Total Views |
- नितेश राणे यांचा आरोप

मुंबई, 
अनेकांचे जीव घेणार्‍या अवैध होर्डिंग कंपनीच्या मालकाचे थेट उद्धव ठाकरे व संजय राऊतांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार Nitesh Rane नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे म्हणाले, काल वादळामुळे मुंबईत ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यात घाटकोपर परिसरात एक मोठे होर्डिंग पडले. त्यात असंख्य निरपराध मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. कालपासून एक माहिती बाहेर येत आहे की, जी संबंधित होर्डिंग लावणारी कंपनी होती, तिला आधीच मुंबई महापालिकेने होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस पाठवली होती.
 
 
Nitesh Rane
 
Nitesh Rane : कार्यकाळ संपल्यामुळे ही नोटीस पाठविण्यात आली होती. तरी त्या मालकाने ऐकले नाही. त्याचे नाव भावेश भिंडे आहे. आता हा भावेश भिंडे नेमका कोणाचा भागीदार आहे, संजय राऊतांचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत, या भावेश भिंडेने सुनील राऊतसह मातोश्रीमध्ये जाऊन फोटो काढला होता का, याचे उत्तर संजय राऊत यांनी आम्हाला द्यावे. रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप करीत बसायचे, पत्र लिहायचे. मग आता एक पत्र पोलिस आयुक्तांना लिहा आणि मागणी करा की, या भावेश भिंडेचे जे भागीदार आहेत, निरपराध लोकांच्या बळीला जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर एफआयआर दाखल व्हावा आणि चौकशी करून त्यांना अटक करावी. असे आव्हान त्यांनी राऊतांना दिले.