विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

    दिनांक :14-May-2024
Total Views |
मुंबई, 
Vidhan parishad Elections : निवडणूक आयोगाने 8 मे रोजी जाहीर केलेल्या मुंबई, नाशिक आणि कोकण शिक्षक तथा पदवीधर अशा चार विधान परिषदेच्या जाहीर केलेल्या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने मुंबई विभागातील शिक्षक आणि पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ तर, कोकण विभागात पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली होती. या चार जागांवरील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत असल्याने निवडणूक आयोगाने ही घोषणा केली.
 
 
Vidhan parishad Elections
 
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार होती. 15 मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे होती. 13 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता, अशा प्रकारे निवडणुकीचा कार्यक‘म जाहीर करण्यात आला होता. मात्र, देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक कामी ड्युटी लागली असल्याने उन्हाळी सुट्यांचा लाभ न मिळालेल्या शिक्षकांना ही निवडणूक जाहीर झाल्याने उर्वरित सुट्यांचादेखील लाभ मिळणार नव्हता.
 
 
Vidhan parishad Elections : शिवाय, काही शिक्षक कुटुंबासह सहल, पर्यटनाला गेले असल्याने या सर्वांच्या आनंदावर विरजन पडल्याने एक नाराजीचा सूर होता. महत्त्वाचे म्हणजे, शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विनंती केली होती. तर, उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल कण्यात आली होती. या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगानेच स्वतःहून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भातला पुढील कार्यक‘म लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.