घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये 13 महिन्यांच्या उच्चांकावर

14 May 2024 17:56:42
नवी दिल्ली, 
Wholesale inflation rate : भारताच्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एप्रिलमध्ये वाढून 1.26 टक्क्यांवर गेला. जो मार्चमध्ये अल्प प्रमाणात वाढून 0.53 टक्के होता. एकूणच एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर 13 महिन्यांच्या उच्चांकावर राहिला. याबाबतची आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केली. फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा दर 0.20 टक्के होता. तो एप्रिलमध्ये वाढला आहे.
 
 
Wholesale rate
 
Wholesale inflation rate : कांद्याचा घाऊक दर एप्रिलमध्ये 59.75 टक्क्यांनी वाढला. मार्चमध्ये तो 56.99 टक्क्यांनी वाढला होता. त्यासोबत एप्रिलमध्ये बटाट्याचा घाऊक दर 71.97 टक्क्यांनी वाढला. जो मार्चमध्ये 52.96 टक्के होता. मार्चमध्ये 4.7 टक्क्यांनी वाढल्यानंतर घाऊक अन्नधान्य महागाईचा दर वार्षिक आधारावर 5.52 टक्क्यांवर पोहोचला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या घाऊक महागाईचा दर एप्रिलमध्ये 4.97 टक्क्यांनी वाढला आहे, जो गेल्या वर्षी याच महिन्यात 1.64 टक्के होता. मार्चमधील 0.77 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत इंधन आणि विजेच्या किमती 1.38 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अन्नधान्य पदार्थ, वीज, कच्चे पेट्रोल आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि इतर उत्पादनांच्या किमतींमधील वाढीमुळे एप्रिलमध्ये महागाईचा दर वरच्या पातळीवर असल्याचे सरकारने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0