गंभीर व्यसन तरीही अनभिज्ञ

smartphone-addiction मुलांचा संवाद विस्कळीत

    दिनांक :14-May-2024
Total Views |
वेध
 
- चंद्रकांत लोहाणा
smartphone-addiction ‘व्यसन' ही समाजाला पोखरणारी एक कीड असली, तरीही आम्ही त्याच्या आहारी जातो. व्यसनाच्या अधीन गेलेल्या माणसाला संपूर्ण जग तुच्छ वाटू लागते. व्यसनाचा हा फास कधी कधी एवढा घट्ट आवळला जातो की, त्यामधून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग कायमचे बंद होतात. smartphone-addiction हे सर्व समजत असूनही त्यापासून आम्हास परावृत्त होणे फार कठीण होऊन जाते. असेच एक मोबाईलचे व्यसन. या व्यसनापायी उमलत्या चिमुकल्यांची पिढी आहारी गेल्याने समाजामध्ये एक ज्वलंत आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. smartphone-addiction नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये मोबाईलमुळे चिमुकल्यांच्या शब्द शिकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. मोबाईल व तत्सम अन्य उपकरणांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील संवाद कमी होत आहे. smartphone-addiction त्याचा परिणाम विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक दिसून येतो. एकटे राहिल्याने किंवा कुटुंबासोबत मोबाईलच्या संपर्कात जास्त वेळ घालविणारी मुले अतिशय कमी बोलतात, कमी ऐकतात व कमी संवाद साधतात, असा निष्कर्ष या अभ्यासामध्ये आढळून आला आहे.
 
 

smartphone-addiction 
 
 
मोबाईलचे होणारे हे दुष्परिणाम लहान मुलांच्या भविष्यासाठी घातक असले, तरीही पालकांमध्ये त्याबाबत अजूनही पाहिजे तेवढी जागरूकता दिसून येत नाही. smartphone-addiction आजकाल अगदी न बोलता येणारी मुलेही मोबाईल हाताळताना दिसून येतात. त्यांच्यासाठी स्क्रीनवर दिसणारे चित्र किंवा ऐकू येणारा आवाज एवढेच काय ते आकर्षण असते. परंतु, हे आकर्षण पालकच त्यांच्यात निर्माण करतात, असे तज्ज्ञांचे ठाम मत आहे. आपल्या मुलांसाठी मोबाईल किती घातक आहे, याची कल्पना असूनही आमचा अमुक अमुक मुलगा किती सराईतपणे मोबाईल हाताळतो, याबाबत कुटुंबातील सदस्यच कौतुकाचे गुण गात असतात. smartphone-addiction ही बाब अतिशय गंभीर असल्याने याचा पालकांनी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी विचार करायला हवा, असेही तज्ज्ञ सुचवितात. स्क्रीनच्या जास्त संपर्कामुळे जवळपास सर्व वयोगटातील मुलांमध्ये संवाद विस्कळीत होत असल्याचे अभ्यासामध्ये आढळून आले आहे. न्यूरो सायंटिस्टनी तर जगातील सर्व पालकांना मोबाईलच्या भयावह दुष्परिणामाची जाणीव करून दिली आहे.smartphone-addiction
 
 
 
त्यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या केलेल्या स्कॅनिंगमध्ये वारंवार सोशल मीडियावर फीड तपासण्याची सवय असलेल्या १२ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या मेंदूमध्ये एक विशिष्ट बदल आढळून आला आहे. या व्यसनापायी मुलांमध्ये आत्मसंयमाचा, जिज्ञासेचा अभाव दिसून येत असून भावनात्मकदृष्ट्या मूल अस्थिर होत आहेत. smartphone-addiction मोबाईलमुळे मुलांची समाजाशी असणारी नाळ तुटत चालली असून संवाद कसा साधायचा, हे मुलांना कळत नाही. आपल्या आयुष्यामध्ये पालक जे अनुभवातून शिकले तो अनुभव या मुलांच्या वाट्याला येत नसल्यामुळे मुलांमध्ये एकटेपणा आणि नैराश्य वाढत आहे. त्यामुळे येणाèया संकटाशी सामना करणे अथवा आयुष्याला सामोरे जाण्याची त्यांची क्षमता कमी होत आहे. नैराश्येने ग्रासलेली अशी उमलती पिढी देशासाठी किती घातक ठरू शकते, याची कल्पनाही न केलेली बरी !smartphone-addiction 
 
 
 
 
मुलगा रडला की त्यास गप्प करण्यासाठी मोबाईल देणारे आजही अनेक पालक दिसून येतील. हाच मोबाईल भविष्यामध्ये आपला घात करेल, याची साधी कल्पनाही त्यावेळी पालकांना नसते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या नादी लागून आम्ही आमच्या एकत्रित कुटुंबास तिलांजली दिली. आजी-आजोबांपासून नातवंडं दूर झाली. smartphone-addiction रामायण, महाभारत, श्रीमद्भगवतगीता यामधील गोष्टी सांगून मुलांचे संस्कृती संवर्धन करणारे आजी-आजोबांना वाळीत टाकल्याने आमच्या मुलांना आज संस्कृतीचा गंधही नाही. ऑफिसमधून घरी आल्यावर पालकही तासन्तास मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसत असतील तर त्या कोवळ्या चिमुकल्यांचा तरी काय दोष? बालमन हे अनुकरणप्रिय असतं. आपल्या सभोवताल घडणाऱ्या घटनांचा बालमनावर अधिक प्रभाव पडतो. त्यामुळे मुलांऐवजी पालकच अधिक दोषी ठरत असतील तर आधी या व्यसनाची दाहकता पालकांनीच समजून घ्यायला हवी. तरच या जीवघेण्या व्यसनापासून आपण उमलती फुलं वाचवू शकू. हेच समाज आणि देशासाठी हितावह राहील.smartphone-addiction
 
 
९८८१७१७८५६