अमेरिकेचा चीनला जोरदार दणका

    दिनांक :15-May-2024
Total Views |
वाशिंग्टन :
America-China : चीनमधून आयात होणार्‍या इलेक्ट्रिक वाहनांवर अमेरिकेने 100 टक्के कर लागू केला आहे. याशिवाय सेमीकंडक्टरवर 50 टक्के, बॅटरीवर 25 टक्के, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमवर 25 टक्के आणि सौर पॅनेलवर 50 टक्के कर लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घेत चीनला जोरदार दणका दिला आहे. बायडेन यांनी आरोप केला आहे की, चिनी सरकारने वर्षानुवर्षे स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम, इलेक्ट्रिक वाहने, सौर पॅनेलसारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात निधी दिला.
 
 
America-China
 
America-China : चीनने उत्पादन करणार्‍या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले आहे. ज्यामुळे चिनी कंपन्या अधिक बळकट झाल्या. इतर देशांच्या तुलनेत चिनी कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्पादने तयार करीत आहेत. आम्ही चीनला बाजारावर अन्यायकारकपणे नियंत्रण ठेवू देणार नाही. आम्हाला चीनशी निकोप स्पर्धा हवी आहे, संघर्ष नाही. नियमांचे उल्लंघन होत असल्याने चीनमधून आयात होणार्‍या काही वस्तूंवर 100 टक्क्यापर्यंत आयातशुल्क लागू केल्याचे ते म्हणाले.