विकासासाठी हवे मोदींचे नेतृत्व : छगन भुजबळ

    दिनांक :15-May-2024
Total Views |
नाशिक, 
भारताची प्रतिमा वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जे निर्णय घेतले, त्यामुळे जगातील नेतेही चकीत आहेत. गेल्या साठ वर्षांत केवळ अंधाधुंद कारभार सुरू होता. मात्र, मोदी यांनी प्रशासनावर पकड निर्माण करून घोटाळे, भ्रष्टाचाराला संपुष्टात आणले. देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मोदींचे नेतृत्व गरजेचे आहे. मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान व्हावे यासाठी आम्ही महायुतीत आल्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Chhagan Bhujbal छगन भुजबळ म्हणाले.
 
 
Chhagan Bhujbal
 
बुधवारी दिंडोरी येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना Chhagan Bhujbal भुजबळ म्हणाले, नागपूरपासून मुंबईपर्यंत झालेला समृद्धी महामार्ग केवळ मोदी यांच्यामुळेच होऊ शकला. प्रत्येक घराला शौचालय देण्यासह बाराबलुतेदार यांना कर्ज देण्याचे काम मोदी यांनी केले आहे. ओबीसीसाठी घरकुल योजना आहे. 80 कोटी गरिबांना मोफत धान्य देण्याची हिंमत यापूर्वी कुठल्याही सरकारने दाखविली नाही. ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ या अभियानातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने केलेले काम कौतुकास्पद आहे. देशाला विकसित राष्ट्र केवळ मोदी करूच शकतात. महायुतीच्या उमेदवाराला मतदान म्हणजेच मोदी यांना मतदान असल्याचे यावेळी ते म्हणाले.