गावठी बनावटी देशी कट्ट्यासह दोघांना पकडले

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- बिटरगाव निंगनूर परिसरातील घटना

उमरखेड, 
Deshi katta seized : अवैध अग्नीशस्त्र बाळगणार्‍यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंद्याचे समूळ उच्चटन याकरीता पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. सोमवार, 13 मे रोजी स्थागुशा पथक उमरखेडला हजर असताना सय्यद समीर सय्यद मुस्ताक (गढीवार्ड, पुसद) याच्याकडे गावठी बनावटीची पिस्टल असून तो उमरखेड पोलिस ठाणे हद्दीत नाथचौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. उमरखेड व परिसरात मागील तीन महिन्यातील ही तिसरी घटना असल्याने सर्वत्र खळबळ उडालली आहे.
 
 
y15May-Deshi-Katta
 
Deshi katta seized  : उमरखेडला शोध घेत असताना एक इसम नाथचौक परिसरात संशयितरित्या उभा असल्याचे दिसल्याने त्याला ताब्यात घेऊन विचारले असता, त्याचे नाव त्याने सय्यद समीर सय्यद मुस्ताक (वय 25) असे सांगितले. त्यास विश्वासात घेवून गावठी पिस्तुलबाबत विचारले असता ती पिस्तुल त्याचा मित्र निंगनूरचा मुतलीफखान अश्रफखान यांच्याकडे दिलेली असल्याचे सांगितले. तेव्हा पंचासमक्ष निंगनूर येथे जावून मुतलीफखानला (वय 27, निंगनूर) ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीची पिस्तुल व तीन काडतूस सापडले. दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल बिटरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, उपनिरीक्षक धनराज हाके, शरद लोहकरे, उपनिरीक्षक रेवण जागृत, बंडू डांगे, प्रशांत हेडाऊ, नीलेश राठोड, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड यांनी पार पाडली.