मतदारसंघाने सर्व राजकीय पक्षांना घेतले सामावून

    दिनांक :15-May-2024
Total Views |
नवी दिल्ली,
देशात राममंदिर आंदोलन सुरू झाल्यानंतर अयोध्या आणि Faizabad Lok Sabha Constituency फैजाबाद लोकसभा मतदारसंघ चर्चेत आले. फैजाबाद मतदारसंघाने कोणताही भेदभाव न करता सर्वच राजकीय पक्षांना सामावून घेतले. बजरंग दलाचे नेते म्हणून ओळखले जाणारे विनय कटियार फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले. पहिल्यांदा ते 1991 मध्ये भाजपातर्फे जिंकले. त्यानंतर दुसर्‍यांदा ते 1996 मध्ये भाजपातर्फे निवडून आले. 1998 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे मित्रसेन यादव यांनी त्यांचा पराभव केला. 1999 मध्ये कटियार तिसर्‍यांदा जिंकले. मात्र, त्यांची हॅटट्रिकची संधी हुकली. ती यावेळी भाजपाचे लल्लुसिंह यांना चालून आली.
 
 
Faizabad Lok Sabha
 
Faizabad Lok Sabha Constituency : 1957 पासून 1984 पर्यंत 1977 चा एक अपवाद वगळता फैजाबाद मतदारसंघ काँग्रेसकडे होता. 1977 मध्ये जनता पक्षाचे अनंतराम जयस्वाल येथून निवडून आले. 1980 मध्ये काँग्रेसचे जयराम वर्मा यांनी जनता पक्षाचे अनंतराम जयस्वाल यांचा पराभव केला. 1984 मध्ये काँग्रेसचे निर्मल खत्री विजयी झाले. त्यांनी भाकपचे मित्रसेन यादव यांचा पराभव केला.
 
 
 
Faizabad Lok Sabha Constituency : 1989 मध्ये भाकपचे मित्रसेन यादव यांनी खत्री यांना हरवत आपल्या पराभवाचा बदला घेताला. 2004 मध्ये बसपाचे मित्रसेन यादव फैजाबादमदून विजयी झाले. मित्रसेन यादव 1989, 1998 आणि 2004 असे तीनवेळा फैजाबाद मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांकडून निवडून आले. एकदा ते बसपाचे, एकदा कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार तर एकदा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. 1984 पासूनच्या फैजाबाद मतदारसंघातील निवडणुकांचा आढावा घेतला, तर एखाद दुसरा अपवाद वगळता बहुतांश निवडणुका निर्मल खत्री, मित्रसेन यादव, विनय कटियार, आणि लल्लुसिंह या चार उमेदवारांतच लढल्या गेल्या आणि आलटूनपालटून या चारपैकीच कोणी तरी विजयी झाले.