आयपीएलची शान, पण स्वाभिमानच गहाण !

IPL-franchise-Goenka-dispute आयपीएलने पछाडले

    दिनांक :15-May-2024
Total Views |
वेध
 
- विजय निचकवडे
IPL-franchise-Goenka-dispute आदर्शाच्या व्याख्या आज बदलल्या आहेत. अगदी सहज आज विचारा तर नेते, अभिनेते, खेळाडू हे आमचे आदर्श असल्याचे सांगणारे बरेच सापडतात. मग आमच्या आदर्शांचा मांडलेला बाजार आणि त्यांचा जाहीर केला जात असलेला अपमान मनाला कुठेतरी वेदना देणारा नव्हे का? IPL-franchise-Goenka-dispute आज सर्वच क्षेत्रात ‘बाजार' मांडला गेला आहे. या बाजारात आमच्या ‘आदर्शां'ची बोली लागली आणि मग त्याच बोलीच्या जोरावर मानापमान नाट्य सुरू झाले. आयपीएलच्या निमित्ताने आमच्या भारतीय खेळाडूंचा मांडला गेलेला, नव्हे त्यांनी मांडून घेतलेल्या बाजारात त्यांच्या चाहत्यांची दुखावणारी मने कदाचित त्यांच्यासाठी महत्त्वाची नसतील, पण एक भारतीय म्हणून चाहताही कुठे चुकत नसावा. IPL-franchise-Goenka-dispute दुसरीकडे मानापमानाच्या नाट्यात खेळाडूंच्या मनोबलाचे होणारे खच्चीकरण नक्कीच देश म्हणून चिंतेचा विषय असू शकेल.
 
 
 
IPL-franchise-Goenka-dispute
 
 
होय, इंडियन प्रीमियर लिग म्हणजेच आयपीएलने तरुणच नव्हे तर सर्वांना पछाडले आहे. दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीत आयपीएलचे सामने पाहणे म्हणजे औषधाच्या गोळ्या घेतल्यासारखे वेळापत्रक अनेकांनी तयार करून घेतले आहे. या मागची कारणे अनेक आहेत. काहींसाठी हे मनोरंजन असेल. IPL-franchise-Goenka-dispute तेवढ्यापुरते पाहून त्यांच्यासाठी हा विषय इथेच संपत असेल, परंतु अनेकांसाठी त्या त्या सामन्यांमध्ये त्यांचे आदर्श खेळत असल्याने तो सामनाही त्यांचा असतो. मग अशावेळी आपल्या आदर्शाचे झालेले कौतुक जसे त्याला समाधान देऊन जाते, तसेच त्याचा झालेला अपमानही मनाला वेदना देणारा असतो. खरे तर या सामान्यांमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू हा व्यवसाय म्हणून खेळतो. पण आम्ही भारतीयांनी एकदा कुणाला आदर्श मानले तर त्यांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पूर्णपणे त्याला स्वीकारतो. मग त्याचा आनंदही आणि अपमानाचे शल्यही!
 
 
 
IPL-franchise-Goenka-dispute मानापमान हा विषय एवढ्यासाठी की, आयपीएलची सुरुवात २००८ पासून झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००७ साली भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या फ्रेंचायझीवर आधारित साखळी सामन्यांची घोषणा केली. धनाढ्य लोकांनी फ्रँचायझी म्हणून खेळांडूना कोट्यवधी-लाखो रुपयांत विकत घेत संघ तयार करणे सुरू केले. या बाजारात सर्वाधिक विकले गेले, ते भारतीय क्रिकेट खेळाडू. IPL-franchise-Goenka-dispute आता काहींच्या मते आमच्या खेळाडूंना किंमत मिळाली, याचा अर्थ आमच्याकडे प्रतिभा आहे, असा काढला जाऊ शकेल. हो, नक्कीच आमच्याकडे प्रतिभा आहे. पण या प्रतिभावंतांकडून देशातील कोट्यवधी चाहत्यांना प्रचंड आशा-अपेक्षा आहेत. तेवढाच अभिमानही आहे. मात्र, आयपीएल सुरू झाल्यापासून दिग्गज खेळाडूंपासून सर्वांनाच फ्रँचायझीकडून अपमानित व्हावे लागत आहे.
 
 
 
हा अपमान नक्कीच भारतीय चाहता सहन करू शकणार नाही. IPL-franchise-Goenka-dispute व्यवसाय म्हणून हा खेळाडूंचा निर्णय असला, तरी आमचा आदर्श म्हणून नक्कीच हे माफक मानले पाहिजे. सुरू असलेल्या २०२४ च्या आयपीएलदरम्यान भारताचा प्रतिभावान खेळाडू आणि लखनऊ संघाचा कर्णधार के. एल. राहुलवर संघाचा मालक संजीव गोएंका यांच्या ओरडण्याचा, संताप व्यक्त करण्याचा व्हिडीओ सर्वत्र फिरला. यश-पराभव हे होणार; पण कोट्यवधी रुपये देऊन खरेदी केल्याने मालकही भर स्टेडियममध्ये त्याच्यावर ओरडू शकला. २०२२ मध्ये रवींद्र जडेजाचे चेन्नई संघाचे असलेले कर्णधार पद अपमानित करून काढले गेले. IPL-franchise-Goenka-dispute हे नाट्यही चांगलेच रंगले. शून्यावर बाद झालेल्या न्यूझीलंडचा खेळाडू रॉस टेलर याला मालकाने थापड मारल्याचे खुद्द त्याने त्याच्या पुस्तकात लिहिले. सौरभ गांगुली याच्यावर झालेली टीका आणि कोलकाता नाईट राईडर्स संघ सोडण्यास भाग पाडण्याचे प्रकार चाहत्यांना आठवत असेल.
 
 
 
आज २००८ पासून मालकांकडून अपमानित होण्याचे प्रकार कायम घडत आहेत. ज्यांना आम्ही आदर्श मानतो, त्यांचे जाहीर धिंडवडे मालक काढतात. कारण, ते पैसे देऊन खरेदी करतात म्हणून. अशावेळी देश ज्यांच्याकडे गौरवाने बघतो, त्यांनी या बाजारात उतरावे का? असा प्रश्न नक्कीच चाहत्यांना पडला असावा. IPL-franchise-Goenka-dispute नवख्या आणि आयुष्याची सुरुवात करणाऱ्यांसाठी आयपीएल ही नवी संधी नक्कीच असेल तर ज्यांच्या देशाचा कोट्यवधी जनतेचे निस्सीम प्रेम आहे, त्यांनी पैशासाठी आपला स्वाभिमान गहाण टाकणे नक्कीच सयुक्तिक नाही. या अपमानातून खच्ची होणारे मनोबल, त्याचा देशासाठी खेळताना क्षमतेवर होणारा परिणाम याचाही विचार व्हायला हवा. आमच्या आदर्श खेळाडूंचा अपमान देशाच्या सन्मानाला ठेच पोहोचविणारा आहे. कदाचित म्हणूनच विदेशी खेळाडूंचा भरणा यात कमी असावा. पण आज धनासाठी मान, प्रतिष्ठा गहाण ठेवायची की, चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरून आपण देशासाठी आहोत, हे दाखविण्याची वेळ आहे. IPL-franchise-Goenka-dispute
९७६३७१३४१७