नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ‘सीईओ’पदी आशुतोष पाठक

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- राजेश एदलाबादकर यांची उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नवनियुक्ती

नागपूर,
Nagpur Nagrik Sahakari Bank नागपूर नागरिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून आशुतोष पाठक व उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजेश एदलाबादकर यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या स्व. बाळासाहेब देवरस सभागृहात झालेल्या एका समारंभात या नवनियुक्त अधिकार्‍यांचा बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे तसेच उपाध्यक्ष अशोक गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

pathak
 
Nagpur Nagrik Sahakari Bank : बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पोतनीस यांचा कार्यकाल 10 मे रोजी पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या निरोपाचा तसेच नवनियुक्त अधिकार्‍यांच्या नियुक्तीचा हा समारंभ होता. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात संजय भेंडे यांनी, संजय पोतनीस यांच्या 19 वर्षांच्या कार्यकाळातील कामाचा आढावा घेतला. त्यांच्या शिस्तबद्ध कामाचा विशेष उल्लेख केला. अशोक अग्रवाल यांनीही पोतनीस यांच्या यशस्वी कारकिर्दीचा उल्लेख करून त्यांना उत्तर आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कर्मचारी व व्यवस्थापनातर्फे मानचिन्ह, शाल व भेटवस्तू देऊन पोतनीस यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कर्माचार्‍यांच्यावतीने व्यवस्थापक अतुल घनोटे यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 
सत्कार समारंभाला संचालक मंडळातील सर्व संचालक, सर्व शाखा व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी विशेषत्वाने उपस्थित होते. संचालन राजेश एदलाबादकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन बँकेचे नवनियुक्त सरव्यवस्थापक मितेश दोबा यांनी केले.