रवींद्र वायकर यांना आयोगाची नोटीस

    दिनांक :15-May-2024
Total Views |
मुंबई, 
निवडणूक खर्चातील तफावत आढळल्यामुळे महायुतीतील शिवसेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार Rabindra Waikar रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची निरीक्षकांसमोर 13 मे रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली होती. 21 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी आपले खर्च सादर केले होते.
 
 
Rabindra Waikar
 
यावेळी Rabindra Waikar रवींद्र वायकर यांच्या निवडणूक प्रचारातील खर्चात दीड लाखांची तफावत दिसून आली, असे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्यात आले. 16 मे रोजी निवडणूक अधिकार्‍यांसमोर प‘त्यक्षात हजर राहून खर्चासंदर्भातील माहिती देण्याचा आदेश नोटीसमधून दिला आहे. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत होत आहे.