काँग्रेसच्या धंगेकरांसह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा

    दिनांक :15-May-2024
Total Views |
पुणे, 
पुणे लोकसभा मतदार संघाच्या मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस उमेदवार Ravindra Dhangekar रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांसह आंदोलन केले होते. याप्रकरणी त्यांच्यासह 40 कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
Ravindra Dhangekar
 
Ravindra Dhangekar : धंगेकर यांनी भाजपावर पैसे वाटप केल्याचा आरोप करीत तक्रार दिली होती. तसेच तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पोलिस ठाण्यासमोर बसून आंदोलन केले होते. मतदानामुळे जमावबंदी लागू केली असतानाही त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र करून आंदोलन केल्याच्या प्रकरणात बधवारी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईनंतर त्यांनी धमकी देत अटक केल्यास पोलिसांना परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांना दिला आहे.