पंतप्रधान मोदींच्या बळकट नेतृत्वाची भारताला गरज

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- उत्तराखंडातील वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची स्तुतिसुमने
 
डेहराडून, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुस्लिमांना कोणताही धोका नाही तसेच विरोधक आरोप करतात, त्याप्रमाणे देशाचे संविधानही धोक्यात नाही. हे धोके दाखवणे म्हणजे काही राजकीय नेत्यांची दुकानदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळकट नेतृत्वाची गरज भारताला आहे, अशी स्तुतिसुमने उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष Shadab Shams शादाब शम्स यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर उधळली. जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत भारताला नरेंद्र मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाची गरज आहे. संपूर्ण जगावर युद्धाचे ढग आहेत. विविध देशांत अराजकता आणि संघर्षाचे वातावरण आहे. त्यामुळेच देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे शादाब शम्स यांनी सांगितले.
 
 
Shadab Shams
 
नरेंद्र मोदी यांना तिसरी कारकीर्द मिळायला पाहिजे. असे न झाल्यास देशाचे नुकसान होईल. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी मुस्लिम समुदायाच्या सदस्यांसह सोमवारी हरिद्वारच्या पिरान कालियार येथील साबीर साहिबच्या दर्ग्यावर नरेंद्र मोदींनी यश मिळावे, यासाठी चादर अर्पण केली. नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान व्हावेत आणि त्या माध्यमातून देशाचा विकास सुरूच राहावा, यासाठी प्रार्थना केली. ज्याला यापूर्वी कल्याणकारी योजनांचा लाभ झाला नाही, अशा शेवटच्या माणसाच्या डोक्यावर आज छत आहे. त्याला शौचालय मिळत आहे, रस्ते तयार होत असून, देश प्रत्येक आघाडीवर प्रगती करीत आहे, असे Shadab Shams शादाब यांनी सांगितले.