साहेब, वाढत्या चोर्‍यांवर बंदोबस्त करा..!

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- पोलिस अधीक्षकांना निवेदन : नेरमध्ये चोर्‍यांचे सत्र

यवतमाळ, 
Thefts increased in Ner : नेर शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या चोर्‍यांचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी उबाठा शिवसेनेकडून पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी नितीन माकोडे, संकेत ठाकरे, खुशाल मिसाळ, गजानन देशमुख, विनोद रंगारी हे पदाधिकारी उपस्थित होते.  यवतमाळातही अनधिकृत ‘होर्डिंग्ज’
 
 
Thefts
 
Thefts increased in Ner : यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या काही दिवसांपासून नेर शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. 13 मे रोजी एकाच दिवशी सहा ठिकाणी धाडसी घरफोड्या झाल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. या वाढत्या चोर्‍यांचा तत्काळ बंदोबस्त करा अन्यथा तीव‘ आंदोलन करू, अशाही इशारा यावेळी देण्यात आला आहे.  आंतरजिल्हा बदलीतील गुरुजींना लागला ‘ब्रेक’