आशियातील सर्वांत मोठे धरण, तरीही पाण्यासाठी मरण

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- मराठवाड्यात भीषण ‘पाणीबाणी’
- सात जिल्ह्यांत 1,706 टँकर्स
 
छ. संभाजीनगर, 
राज्यात अवकाळी पावसाचा जोर सुरू असला, तरी दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ 25 टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यात Water crisis पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांत तब्बल 1 हजार 706 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
 
 
Water crisis
 
Water crisis : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वांत मोठे धरण ज्या पैठण तालुक्यामध्ये आहे तेथे सर्वाधिक टँकर पाहायला मिळतात. पैठण तालुक्यातील 124 घरे असलेल्या अब्दुलपुरतांडा गावात आठ दिवसाला एक टँकर पाणी येते. या गावाच्या प्रत्येक घरासमोर पाण्याचे ड्रम पाहायला मिळतात. ड्रम चोरीला जाऊ नये म्हणून त्यावर प्रत्येकाने नाव टाकले आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ 23.43 टक्के असून, मागील वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी कमी झाला आहे. मध्यम प्रकल्पांत 35 टक्के, तर लघु पाटबंधारे प्रकल्पांत 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मराठवाड्यातील टँकर संख्या 
जिल्हा टँकरची संख्या
छ. संभाजीनगर 656
जालना 488
बीड 382
परभणी 5
नांदेड 16
धाराशिव 131
लातूर 21