लालफीतशाहीत अडकली ज्वारीची खरेदी

-खुल्या बाजारात होते लुट -शासकीय खरेदीची मागणी

    दिनांक :15-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अंजनगाव सुर्जी,
purchase of sorghum : तालुक्यात मागील दोन वर्षापासून उन्हाळी ज्वारीचे पेरा वाढलेला आहे. गेल्या वर्षी शासकीय ज्वारी खरेदी केंद्र नसल्याने ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना खुल्या बाजारात बेभाव ज्वारी विकावी लागली. यंदाच्या हंगामात 1550 एकरावर ज्वारीचा पेरा आहे. याही वर्षी शासकीय खरेदी लालफीतशाहीत अडकल्याचे दिसत आहे. शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.  मनपा घाटकोपरच्या घटनेचा बोध घेणार का?

ASDF 
 
 
ज्वारी पिक उत्पादनाचा असलेला कमी खर्च, निव्वळ ज्वारी व कडब्या स्वरुपात मिळणारी नगदी रक्कम पाहता तालुक्यात ज्वारीचा पेरा वाढलेला आहे. सध्या ज्वारी सोंगणीचा हंगाम सुरु आहे. अंजनगाव सुर्जी तालुका खरेदी विक्री संघामार्फत ज्वारी, मका खरेदीची नोंदणीची जाहीरात झाली. परंतु, खरेदी विक्री संस्थेला नाफेड मार्फात आय.डी. मिळाली नसल्याने खरेदीची नोंदणी होऊ शकत नाही. शेतकर्‍यांना नोंदणी केंद्रावर दस्तऐवज घेऊन नाहक हेलपाटे घालावे लागत असल्याने खरेदीविक्री संघाची डोकेदुखी वाढली आहे. तालुक्याच्या खुल्या बाजारात 2100 ते 2200 पर्यंत ज्वारीला भाव मिळत असून शासकीय खरेदीचा भाव 3180 रुपये आहे. शेतकर्‍यांकडून शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरु करण्याचा दबाव वाढत आहे.
 
 
//परवानगी मिळताच खरेदी
 
 
ज्वारीची शासकीय खरेदी करण्याबाबत तहसीलदार व संबंधितांकडे पाठपुरावा सुरु आहे. खरेदी विक्री संघामार्फत संपूर्ण व्यवस्थेची उभारणी करण्यात आली आहे. डीस्ट्रीक्ट मार्केटींग ऑफीसकडून आय. डी. मिळण्यास उशीर होत आहे. तो प्राप्त होताच ज्वारी नोंदणी व खरेदी विनाविलंब केल्या जाईल, असे खविसचे अध्यक्ष गजानन धोटे यांनी सांगितले.
 
 
//लवकरच खरेदी सुरू करू
 
 
आमच्या कार्यालयाकडून शासकीय ज्वारी खरेदी करिता पाठपुरावा केला जात आहे. तांत्रिक कारणाने आय.डी. मिळण्यास विलंब होत आहे. आज किंवा उद्या आयडी मिळण्यात येईल, असे जिल्हा मार्केटीग अधीकारी पवार यांनी सांगितले.