नागपुरातील झिंगाबाई टाकळी परिसरात बिबट्याचा वावर

16 May 2024 13:08:12

lwperd
 
नागपूर,
Zingabai Takli बुधवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास पश्चिम नागपुरातील झिंगाबाई टाकळी परिसरातील सावंत सोसायटीत बिबट्याने एका वासराला मारल्याने रात्री उशिरापर्यंत या परिसरात दहशत निर्माण झाली. प्रत्यक्षदर्शी एका तरुणाने या बिबट्याला बघितल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तो कुठून आला कुठल्या दिशेने गेला हे मात्र कळू शकले नाही. दरम्यान गाईचे वासरू मारल्याने व लोकांनी आरडाओरडा केल्याने ते तसेच टाकून हा बिबट्या पसार झाल्याची माहिती घटनास्थळी असलेले प्रवीण पाटील यांनी दिली. त्यांच्या घरासमोरच हा सर्व घटनाक्रम घडला हे विशेष. टॉवर लाईनच्या सुमारे पाचशे मीटर अंतरावर हा परिसर असून जवळच गोरेवाडा प्रकल्प आणि जंगलाचा परिसर आहे.  महाराष्ट्रासह या राज्यात या तारखेपासून होणार मान्सूनला सुरवात
Powered By Sangraha 9.0