मालिवाल हल्ला प्रकरणावर केजरीवाल यांचे मौन

16 May 2024 19:37:05
लखनौ, 
Maliwal attack case : राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्यावर मु‘यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मौन पाळले. पक्षाची कोंडी होत असल्याचे पाहून आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह व समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सारवासारव करीत मालिवाल यांच्या प्रकरणापेक्षा देशात महत्त्वाचे मुद्दे असून, त्यावर बोला, असे माध्यम प्रतिनिधींना सूचवले.
 
 
SF
 
लखनौ येथे समाजवादी पक्षाच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी दोन्ही पक्षाची संयुक्त पत्रपरिषद झाली. यावेळी माध्यमांनी केजरीवाल यांना मालिवाल यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला. अडचणी आलेले केजरीवाल यांनी बोलण्यास नकार दिला. तर, यापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे सांगत अखिलेश यादव यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संजय सिंह यांनी आक‘मक होत भाजपावर आरोपांची सरबत्ती सुरू केली. ते म्हणाले, मणिपूर, प्रज्वल रेवन्ना प्रकरणी केंद्र सरकारने काय केले, याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. मालिवाल यांच्या प्रकरणापेक्षा देशात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहे. त्यावर बोलायला हवे.
 
 
देशातील जेवढे मुद्दे आम्ही उपस्थित केले, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले पाहिजे. मालिवाल जेव्हा कुस्तीपटूंशी चर्चा करण्यासाठी जंतरमंतर येथे गेल्या, तेव्हा त्यांच्यासोबत गैरवर्तन झाले. त्यावेळी सर्व मौन होते. याप्रकरणी राजकारण करू नये, हा आमच्या पक्षाचा मुद्दा असून, आम्ही तो हाताळण्यात समर्थ आहे.
 
 
भाजपाने राजकारण करू नये
 
 
संजय सिंह म्हणाले की, मणिपूरमध्ये जे काही घडले, ते पाहून संपूर्ण देशाला वेदना झाल्या होत्या. मात्र, पंतप्रधान मोदी अद्याप मौन बाळगून आहे. त्यांनी महिलांचे शोषण करणार्‍या प्रज्वल रेवन्नासाठी मते मागितली. कुस्तीपटूंची भेट घेण्यासाठी गेलेेल्या मालिवाल यांना पोलिसांनी मारहाण केली. यावर माध्यमांनी भाजपाला प्रश्न विचारायला हवे होते. आता मालिवाल प्रकरणावर केवळ राजकारण केले जात आहे.
Powered By Sangraha 9.0