अमरावती विद्यापीठ ‘एमपेट’ निकाल घोषित

4003 पैकी 960 विद्यार्थी उत्तीर्ण

    दिनांक :18-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Amravati University : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने 16 व 17 मार्च रोजी घेण्यात आलेल्या आचार्य-2023 पदवी पूर्व परीक्षेचा (एमपेट) निकाल 18 मे रोजी घोषित करण्यात आला आहे.
 
 
FJskjf
 
 
सदर परीक्षा अमरावती विभागातील अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ जिल्ह्रांतील 13 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. परीक्षेला एकूण 4003 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 960 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा 23.98 टक्के निकाल लागला आहे. परीक्षेचा निकाल विद्यापीठ वेबसाईटवरील पीएच.डी. पोर्टलवर तसेच विद्यापीठाच्या राजपत्र भाग-3 मध्ये उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांनी दिली आहे. निकालाबाबत परीक्षार्थींना कुठलीही अडचण असल्यास त्यांनी मोनाली तोटे यांचेशी दूरध्वनी क्र. 9763833969 किंवा उपकुलसचिव (आचार्य कक्ष) डॉ. दादाराव चव्हाण यांचेशी 9130277895 वर किंवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधता येईल, असेही विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात आले आहे.