कुंभारटोळीत बाल संस्कार वर्गाचा समारोप

    दिनांक :18-May-2024
Total Views |
 
kumar 
 
नागपूर, 
Kumbhartoli राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि लोककल्याण समिती संयुक्त विद्यमाने आयोजित बर्डी टेकडी शाखेचा बाल संस्कार शिबिर ३० एप्रिल ते ११ मे या दरम्यान घेण्यात आले होते .समारोपाच्या वेळी पंधरा दिवसांच्या शिबिरात शिकविण्यात आलेल्या विषयांचे प्रात्यक्षिक मुलांनी उत्तम सादर केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माधव गोडसे आणि प्रमुख वक्ता म्हणून प्रा विजय कैथे लाभले.त्यांनी संस्काराचे महत्त्व गोष्ट रुपात पटवून दिले. माधव गोडसे यांनी विविध श्लोकांच्या भावार्थाचे मार्गदर्शन केले. सेवा सदन शाळेच्या शिक्षिका हर्षदा उईके प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन भारती ठाकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय, आभार प्रदर्शन समीर अवधाने यांनी केले पाहुण्यांच्या हस्ते मुलांना चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण करण्यात आले. वंदे मातरम् नंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.या प्रसंगी नगर सेवाप्रमुख प्रतिन पट्टलवार, अमोल तपासे, अजय मुंजे उपस्थित होते.
सौजन्य: अमोल तपासे, संपर्क मित्र