महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार

18 May 2024 13:16:26
मुंबई,   
Maharashtra Weather महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणात आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  दुधापेक्षा दुप्पट कॅल्शियम देणारे खाद्यपदार्थ

Maharashtra Weather 
 
...अखेर स्वाती मालीवाल प्रकरणात बिभव कुमारला अटक  मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. Maharashtra Weather नाशिकमध्ये आज म्हणजेच शनिवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांसह विदर्भातील काही ठिकाणी वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रविवारी विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांबाबत बोलायचे झाले तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, नगर, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.  एम चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज सिस्टम जगात सर्वोत्तम, VIDEO
Powered By Sangraha 9.0