विद्यार्थ्यांना मिळणार पहिल्याच दिवशी ‘पाठ्यपुस्तके’

    दिनांक :18-May-2024
Total Views |
- एकूण 9.5 लाख पुस्तके : सहा तालुक्यांना पोहोचली

यवतमाळ, 
Students will get 'books' : विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहे. या संदर्भात प्रशासनाचे नियोजन झाले आहे. आतापर्यंत 6 तालुक्यांत साडेतीन लाख पुस्तके पोहोचली असून येत्या काही दिवसांत उर्वरित तालुक्यांना पाठ्यपुस्तके पोचविली जाणार आहे. समग‘ शिक्षा अभियानातंर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळावी हा प्रशासनाचा प्रयत्न असतो.
 
 
books
 
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठपुस्तके मिळाली. यंदाही त्याच पद्धतीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका, शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळांसाठी 9 लाख 66 हजार 860 पुस्तकांची मागणी आहे. यंदा प्रत्येक वर्गाचे पुस्तक चार भागांत असून त्याला एकात्मिक स्वरूप आहे. याशिवाय नोटस काढण्यासाठी सराव पेज दिले जाणार आहेत. सर्व पुस्तकांची वाहतूक अमरावती बालभारती डेपोतून तालुका स्तरावर सुरू आहे. आतापर्यत दारव्हा, दिग‘स, पुसद, उमरखेड, वणी, मारेगाव या तालुक्यात पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. उर्वरित तालुक्यात येत्या पंधरा दिवसात पाठपुस्तके पोचविली जाणार आहेत.
 
 
Students will get 'books'  : शाळांच्या मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांच्या वितरणाची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळत असल्याने विद्यार्थीही पहिल्याच दिवशी शाळेत हजेरी लावत आहेत. बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा डेपोस्तरावर झाला असून अमरावती येथून दररोज पुस्तके पाठविली जात आहेत. या महिन्यात सर्व शाळा स्तरावर पुस्तके पोचविली जाणार आहे. यासाठी युद्धस्तरावर समग्र शिक्षा अभियानाची मोहीम सुरू आहे.
आतापर्यंत झालेला पुरवठा
तालुका - पुस्तक संख्या 
दारव्हा - 60,264
पुसद - 57,745
उमरखेड - 43,938
वणी - 41,999
मारेगाव - 18,327