रानडुकराच्या हल्ल्यात मुलगा जखमी

18 May 2024 18:08:12
कारंजा लाड,
wildboar attack एका १६ वर्षीय मुलावर रानडुकराने हल्ला केल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कारंजा तालुयातील मोखड शेत शिवारात घडली. जगदीश संतोष सावरकर असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव असून तो मोखड येथील रहिवासी आहे.
 

rtrtrt 
 
 
wildboar attack प्राप्त माहितीनुसार सायंकाळी ६ वाजता तो शेतात काम करीत असताना शेतालगतच्या नाल्यात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्याचेवर अचानक पणे हल्ला चढविला त्यामुळे त्याच्या पायाला मोठी जखम झाली. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील उपचारा नंतर त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान दिवसेंदिवस कारंजा तालुयात रानडूकराच्या हल्ल्याच्या घटनात वाढ होत असल्याने शेतकरी व शेतमजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केल्या जात आहे.
Powered By Sangraha 9.0