हवे तर भाजपला मतदान करा, तृणमूलला नको

    दिनांक :02-May-2024
Total Views |
- अधीररंजन चौधरी यांच्या वक्तव्याने खळबळ
 
नवी दिल्ली,
लोकसभा निवडणुकीतील तिसर्‍या टप्प्याच्या मतदानासाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशातच काँग्रेसचे पश्चिम बंगालच्या बहरामपूर मतदार संघातील उमेदवार Adhiraranjan Chaudhary अधीर रंजनचौधरी यांनी, हवे तर भाजपला मतदान करा, पण तृणमूल काँग्रेसला नको, असे वक्तव्य केले आहे.
 
 
Adhiraranjan Chaudhary
 
त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधीररंजन हे भाजपची बी-टीम असल्याची टीका तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांनी केली. बंगाली जनतेला विरोध करणाराच भाजपाचा प्रचार करू शकतो. आता त्यांना बहरामपूरमधील जनता 13 मे रोजी उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला. यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, बंगालमध्ये भाजपाच्या जागा कमी करणे हेच पक्षाचे उद्दिष्ट आहे. तृणमूल पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे. Adhiraranjan Chaudhary अधीररंजन यांची भूमिका वैयक्तिक असून, त्यांशी पक्ष सहमत नाही.
 
व्हिडीओ व्हायरल, काँग्रेसकडून सारवासारव
Adhiraranjan Chaudhary : अधीररंजन चौधरी यांचा एका सभेतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो तृणमूल काँग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्विट केला. यात ते तृणमूलला मतदान करण्याऐवजी भाजपाला मतदान करण्याचे वक्तव्य करताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागा वाटप न होण्यामागे अधीररंजन चौधरीच जबाबदार आहेत, ते बंगाल विरोधक आहेत तसेच भाजपाचा प्रचार करीत असल्याची टीका तृणमूलचे खासदार गोखले यांनी केली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याप्रकरणी सारवासारव केली.