40 वर्षे तुमच्या घरी राहिली, मग सुनेत्रा बाहेरची कशी?

    दिनांक :02-May-2024
Total Views |
- प्रचारसभेतून पुतण्याचा काकावर पलटवार
 
पुणे, 
अख्ख कुटुंब माझ्याविरोधात आहे. मी घेतलेली भूमिका विकासाला समर्थन देणारी आहे. बारामतीची जनता माझ्यासोबत असल्याने मला फरक पडत नाही. 40 वर्षांपूर्वी सुनेत्रा पवार कुटुंबात आली. तेव्हापासून ती तुमच्या घरी एकत्र राहिली, मग आता तिला बाहेरची समजाल का, असा सवाल उपमुख्यमंत्री Ajit Pawar अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना गुरुवारी प्रचारसभेतून केला.
 
 
Ajit Pawar
 
बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना Ajit Pawar अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात येण्याची संधी दिली. मला शरद पवारांनी राजकारणात येण्याची संधी दिली. 1987 पासून आतापर्यंत ते म्हणतील तीच भूमिका आम्ही घेतली आहे. जिल्हा परिषद, साखर कारखाने आणि इतर संस्था कशा ताब्यात राहतील, यासाठी आम्ही प्रयत्न केले. पक्ष वाढीसाठी जिवाचे रान केले. मात्र, आता आम्हाला बाहेरचे समजले जात आहे. घरातील सर्व माझ्याविरोधात प्रचार करीत आहे; मात्र मतदार आमच्यासोबत असल्याने सुनेत्रा यांचा विजय पक्का आहे.

पुण्यातून महायुतीचे चारही खासदार निवडून येणार
परवा मी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करीत होतो. तेव्हा ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील चारही खासदार निवडून आणा, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो. मी त्यांना सर्व उमेदवार निवडून देण्याची हमी दिली आहे. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे की राहुल गांधी, हा निर्णय जनतेने घ्यायचा आहे, असे Ajit Pawar अजित पवार यांनी सांगितले.