‘पॉप, पार्टी, पॉर्न’ची संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा उद्योग

    दिनांक :02-May-2024
Total Views |
- चित्रा वाघ यांचा जोरदार प्रहार

मुंबई,
छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीत उद्धव आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करीत आहेत, असा प्रहार भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष Chitra Wagh चित्रा वाघ यांनी गुरुवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. चित्रा वाघ यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी उबाठा गटातर्फे बनवलेल्या जाहिरातीमधून एक पॉर्न स्टार जनतेला महिलांवरील अत्याचार कधी थांबणार, असा सवाल विचारत आहे. आपल्या प्रचारासाठी उबाठाची जाहिरात पाहून स्त्री, पत्नी, आई आणि मुलगी म्हणून माझी मान शरमेने खाली झुकली.
 
  
Chitra Wagh
 
उबाठाच्या निवडणूक प्रचाराची जाहिरात बनवणारी कंपनी, ठाकरे परिवार तसेच जाहिरातीत पित्याची भूमिका वठवणारा पॉर्न स्टार आणि उबाठा गट यांचा संबंध काय, याचे उत्तर ठाकरे यांनी महाराष्ट्राला द्यावे. निवडणुकीच्या काळात आणि त्याआधीपासून उबाठा गटाचे नेते महिलांचा वारंवार अपमान करीत आहेत. अमरावती येथील महायुतीच्या महिला उमेदवाराबाबत उबाठा नेत्यांनी कोणती भाषा वापरली, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यापुढे जाऊन उबाठा गटाच्या निवडणूक प्रचाराच्या जाहिरातीत उल्लू अ‍ॅप या अश्लील अ‍ॅपवरून लहान मुलींबरोबर अश्लील चित्रीकरण करणार्‍या पॉर्नस्टारच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. जाहिरातीत पित्याची भूमिका करणारा पॉर्नस्टार महिलांवरील अत्याचार कधी थांबणार, असा प्रश्न विचारतो, यासारखी महिलांची क‘ूर चेष्टा कोणी केली नसेल, असा संताप सवाल Chitra Wagh वाघ यांनी व्यक्त केला.
 
आदूबाळ नाईट लाईफ प्रॉडक्शन हाऊसची जाहिरात
आदूबाळ नाईट लाईफ प्रॉडक्शन प्रा. लि.ने बनविलेल्या या जाहिराती आहेत. त्यात यांना पात्र म्हणून पॉर्नस्टारच मिळाला का, बापाच्या भूमिकेत असलेला हा पॉर्नस्टार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आदर्श ठरवायचा आहे, याची उत्तरे उद्धव ठाकरेंनी द्यावी, असे आव्हान Chitra Wagh चित्रा वाघ यांनी दिले.