मुलायमसिंह यांनी एकदाच पूर्ण केला कार्यकाळ

    दिनांक :02-May-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री Mulayam Singh Yadav मुलायमसिंह यादव मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले, पण एकदाच त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. मैनपुरीतून पाच निवडणुका लढवलेल्या यादव यांना एका निवडणुकीचा अपवाद वगळता आपला पाच वर्षांचा कार्यकाळ कधीच पूर्ण करता आला नाही. एकदा लोकसभा बरखास्त झाली, तर तीन वेळा वेगवेगळ्या कारणाने यादव यांनी राजीनामा दिला. 2009 ते 2014 या काळात एकदाच त्यांना आपला खासदार म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला.
 
 
Mainpuri
 
1996 मध्ये Mulayam Singh Yadav मुलायमसिंह यादव पहिल्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले. 1998 आणि 1999 च्या निवडणुकीत सपाचेच बलरामसिंह यादव या मतदारसंघातून विजयी झाले. 2004 पासून हा मतदारसंघ मुलायमसिंह यादव यांच्या घराण्याच्या ताब्यात आहे. 2004 ची लोकसभा निवडणूक यादव यांनी दुसर्‍यांदा जिंकली, पण काही महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत सपाचे धर्मेंद्र यादव विजयी झाले. 2009 मध्ये मुलायमसिंह तिसर्‍यांदा या मतदारसंघातून विजयी झाले. यावेळी त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते चौथ्यांदा मैनपुरीतून विजयी झाले. मात्र, काही महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजयी झाल्यानंतर यादव यांचे 2022 मध्ये निधन झाले. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. त्यात त्यांची सून डिंपल यादव विजयी झाल्या.
 
 
मैनपुरी मतदारसंघात यादव मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे 4 लाखांवर आहे. त्यानंतर शाक्य मतदार अडीच लाख आहे. दोन लाख क्षत्रीय, सव्वा लाख लोधी, तर ब्राम्हण, पाल, बघेल, कश्यप आणि अनुसूचित जातीचे मतदार प्रत्येकी एक लाखाच्या घरात आहे. मुस्लिम मतदारही 70 हजाराच्या घरात आहे. भाजपा उमेदवार जयवीरसिंह यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मैनपुरी सदर मतदारसंघातून सपा उमेदवार राजू यादव यांचा पराभव केला. यादव 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते.