शिवसेना, मनसेचा डीएनए एकच : श्रीकांत शिंदे

    दिनांक :02-May-2024
Total Views |
मुंबई, 
शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा डीएनए एकच असून, मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सूतोवाच खासदार Shrikant Shinde डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. आपली महायुती लोकसभेप्रमाणेच विधानसभा आणि महापालिकांतही कायम राहिल्यास महाराष्ट्राला अपेक्षित असलेले चित्र नक्कीच दिसू शकेल, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
 
 
Shrikant Shinde
 
धर्मवीर आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे वेगळे नाते होते तसेच नाते आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे, हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे शिंदे म्हणाले. 4 जून रोजी कल्याण लोकसभेचा निकाल लागेल, त्यावेळि मनसेच्या कार्यकर्त्यांचाही त्यात तितकाच वाटा असेल, असे शिंदे यांनी सांगितले.
 
एक ठाकरे धनुष्यबाणाला, दुसरे पंजाला मत देणार
ज्या विचारांमुळे शिवसेना वाढली, ते विचार सत्ता आणि खुर्चीसाठी विकण्याचे काम शिल्लक सेनेच्या नेत्यांनी केल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. जे लोक सावरकरांना शिव्या देतात, त्यांचे शिवतीर्थावर स्वागत करण्याची नामुष्की यांच्यावर आल्याचे सांगत, आज एक ठाकरे धनुष्यबाणाला, तर दुसरे ठाकरे पंजाला मत देणार असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. कोरोना काळात राज्याला नेत्याची गरज होती, तेव्हा हे घरात बसून घोटाळे करति होते. त्यांच्याकडे ‘सिम्पथी’ नव्हे, तर फक्त संपत्ती असल्याचा टोला Shrikant Shinde शिंदे यांनी लगावला.