नमाज वाचताना कोसळले आणि पैगंबरवासी झाले !

    दिनांक :02-May-2024
Total Views |
लखनऊ,  
died by heart attack नमाज वाचताना एक निवृत्त लष्करी वृद्ध कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. गाझियाबादच्या मुरादनगर भागात नमाज पठण करताना अचानक एक वृद्ध व्यक्ती मागे पडले आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मशिदीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये नमाज वाचताना  एक वृद्ध व्यक्ती अचानक मागे पडली . मशिदीत उपस्थित असलेले लोक तेथे पोहोचले तोपर्यंत वृद्धाचा मृत्यू झाला होता.  चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त बर्फ...इस्रोचा नवा खुलासा
  
 
45454
 
died by heart attack हाजी हनीफ (80) असे मृताचे नाव असून ते लष्करातून निवृत्त झाले होते. हाजी हनीफ हे आदर्श कॉलनीत राहत होते आणि नमाज वाचण्यासाठी जवळच्या मशिदीत गेले असता अचानक ते मागे पडले.त्यांना असे पडताना पाहून मशिदीत उपस्थित असलेले अनेक लोक तेथे धावले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. अशातच वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला.  'हा' हेअर मास्क १५ दिवस होत नाही खराब...
 
अशीच घटना वाराणसीतूनही समोर आली
वाराणसीमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे चेतगंज भागात जिममध्ये व्यायाम करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला आधी डोकेदुखी झाली, त्यानंतर तो बेंचवर बसला, त्यानंतर तो अचानक खाली पडला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिममध्ये व्यायाम करण्यासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू.
 
अशीच एक घटनेत गेला दीपक  
died by heart attack पियारी भागात राहणारा 32 वर्षीय दीपक गुप्ता हा बॉडी बिल्डिंगचा व्यवसाय करायचा. दररोज प्रमाणे ते शहरातील सिद्धगिरी बाग परिसरात असलेल्या जिममध्ये सकाळी व्यायामासाठी आले होते. व्यायाम करताना डोके दुखू लागल्यावर तो खाली बसला आणि डोके धरले. बसल्यानंतर काही वेळाने दीपक जमिनीवर पडला आणि वेदनेने करडू लागला. दीपक जमिनीवर पडल्याचे पाहून जवळच व्यायाम करत असलेले इतर तरुण दीपकच्या दिशेने धावले. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. यानंतर दीपकला तात्काळ महमूरगंज परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केले.