मालवाहकाची पोलिस वाहनाला धडक, एकाचा मृत्यू, पाच जखमी

    दिनांक :22-May-2024
Total Views |
गोंदिया :
Accident भरधाव जाणाऱ्या मालवाहक ट्रकने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस वाहनाला धडक दिली. पोलीस वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला धडकले. दरम्यान दुचाकी दही धडक बसल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तिघे जखमी झाले. साहिल कुडमेथे असे मृतकाचे नाव आहे.
 

Accident 
 
ही घटना आज बुधवार 22 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील रिंग रोडवरील रेल्वे फाटा येथे घडली. पोलीस वाहनातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्यासह त्यांचा वाहन चालक पांडेही जखमी झाला. सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. धडकेत पोलीस वाहन क्षतिग्रस्त झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींचेही प्रचंड नुकसान झाले. दरम्यान वाहन चालक घटनास्थळावर प्रसार झाला.Accident पोलिसांनी घटनेची नोंद केली असून वाहन चालकाचा शोध सुरू आहे.