मानोरा,
डीबीटी dbt म्हणजे (डायरेट बेनिफिट ट्रान्सफर) अंतर्गत लाभ हस्तांतरणाचे प्राथमिक उद्दिष्ट केंद्र सरकारने प्रायोजित केले आहे. निधीच्या वितरणात पारदर्शकता आणणे, बोगस लाभार्थीची यादी संपविणे, हा डीबीटीचा उद्देश आहे. देशभर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थीना आता थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शासनाने २७ मे पर्यंत या योजनेच्या सर्व लाभार्थीना संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यलयात कागदपत्र जमा करण्याचे निर्देश तहसीलदार संतोष यावलीकर यांनी दिले आहेत.
संजय गांधी निराधार dbt योजना व श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थीसाठी पूर्वी तहसील कार्यालयामार्फत लाभार्थीची यादी बँकेला पाठवून त्यानुसार बँकेमार्फत हा निधी लाभार्थीच्या खात्यात जमा केला जात होता. यामुळे लाभार्थी यांना पैसे मिळण्यासाठी उशीर व्हायचा योजनेचे लाभार्थी बँकेत पैसे जमा झाले का यासाठी त्यांना चकरा मारावे लागत असे. परंतु आता २७ मे नंतर या लाभार्थीचे पैसे सरळ डिबीटी मार्फत सरळ बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जेष्ठ, अपंग, वृद्ध महिला यांना बँकेत चकरा मारण्याची गरज पडणार नाही. २७ मे अगोदर पात्र लाभार्थी यांनी संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालयात आपले कागदपत्राची झेरास प्रत देवून निश्चित व्हावे. अन्यथा लाभार्थी अनुदान पासून वंचित राहावे लागणार आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थी यांनी जिवंत असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे पास बुक, आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर हे सर्व कागदपत्रे जमा केल्यावरच लाभार्थी यांना अनुदान दिल्या जाईल.
-संतोष यावलीकर (तहसीलदार)