चिरचाडी येथे चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान

    दिनांक :23-May-2024
Total Views |
कुरखेडा, 
Cyclone 21 मे रोजी आलेल्या मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे तालुक्यातील चिरचाडी, लक्ष्मीपुर येथील काही घरांवर झाडे पडून मोठ्या प्रमाणात हानी झाली. सदर नुकसानग्रस्त घरांची पाहणी आमदार कृष्णा गजबे यांनी केली. रात्रीच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळाने चिरचाडी, लक्ष्मीपुर व लगतच्या परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याबरोबरच घरांची छपरे उडाली.
 

cyclone 
 
तसेच झाडेही मोडून पडली. या चक्रीवादळामुळे लखंदाश श्यामराव करपते, मोरेश्‍वर श्रीराम उईके, शशिकला सुखदेव कावसे यांच्या घराचे छप्पर उडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. काही घरांवर झाडे पडल्याने राहत्या घराचे आणि घरगुती सामानाचेही नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी चिरचाडी व लक्ष्मीपूर गावात जाऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली आणि घरांची पाहणी केली. त्यानंतर संबधित विभागाला पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाईचे आदेश आमदार गजबे यांनी दिले.Cyclone  यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, रविंद्र गोटेफोडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक खेमनाथ पाटील डोंगरवार, ग्रामसेवक गेडाम व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.