तभा वृत्तसेवा
भंडारा,
Lord's Junior College महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड द्वारे इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये उदयन बहुद्देशीय विकास संस्थेंतर्गत द लॉर्ड्स पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा ने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही शंभर टक्के निकाल दिला आहे. विशेष म्हणजे विज्ञान शाखेतून इशिका काटेखाये हिने 93.33 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून दुसरा क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे. तसेच अवनी सेलोटे 91.83 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून तिसरा स्थान व वेदिका नंदुरकर व प्रचीती पडोळे यांनी 90.33 प्रतिशत अंक प्राप्त करून जिल्हात पाचवा येण्याचा मान मिळविला आहे.
4 विद्यार्थ्यांनी 90 टक्के हून अधिक प्राविण्य क्षेणीत आहेत. 30 विद्यार्थ्यांनी 85 टक्केच्या वर, 56 विद्यार्थांनी 80 टक्के च्या वर तर 79 विद्यार्थिनी 75 टक्के च्या वर गुण मिळवून शाळेचे नावलौकिक केले. त्यात गणित विषयात भार्गवी खोकले हिन 100 टक्के गुण घेत बोर्डातून प्रथम क्रमांक पटकावीला. इंजीनियरिंग विभागातून कॉम्पुटर सायन्स विषयात इशिका काटेखाये हिला 194, अवनी सेलोटे 183 गुण, फिशरी विषयात अमिषा बेद्पुरीया 194, वेदिका नंदुरकर 189 गुण घेऊन बोर्डात नामांकन प्राप्त केले. त्याचप्रमाणे इतर सर्व विषयात सुद्धा विद्यालयातील विद्यार्थांनी प्राविण्य मिळवून शाळेचे नाव लौकिक केले.Lord's Junior College शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम व पालकांचे धैर्यपूर्ण सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. याकरिता संस्थेचे सचिव डॉ. आशिष पालीवाल, प्रशासक राजेश जगनिक, प्राचार्य सुनंदा साठे, पर्यवेक्षिका प्रणिता लाहोटी, अरुणा उपरकर, सर्व विषय शिक्षक व कर्मचा-यांनी गुणवंत विद्यार्थांचे पारितोषिक देवून अभिनंदन केले व पूढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठया प्रमाणात उपस्थिती होती.