तहसीलदार गीतांजली गरड व लिपिक जाळ्यात

24 May 2024 20:39:24
तभा वृत्तसेवा
चांदूर बाजार, 
Tehsildar Gitanjali Gard : शेतीच्या वाटणीपत्रानुसार फेरफार करण्याकरिता चांदूर बाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड व लिपिक किरण बेलसरे यांनी लाच मागितल्या प्रकरणी दोघांवरही गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
 
 
KLKas
 
घटनेतील तक्रारदाराने 28 मोर्च रोजी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीचा वाटणीपत्रानुसार फेरफार करण्याबाबतचा आदेश काढून देण्याकरिता लिपिक किरण बेलसरे स्वतः करीता व तहसीलदार गीतांजली गरड यांच्याकरिता 25 हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची ही तक्रार होती. तक्रारीवरून 28 मार्चला करण्यात आलेल्या पडताळणी दम्यान किरण बेलसरे यांनी रकमेची तडजोड करीत 20 हजाराची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर 8 मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तहसीलदार गीतांजली गरड यांचे लिपिक किरण बेलसरे हे खाजगी इसमास लाच देण्यास प्रोत्साहित करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून चांदूर बाजार पोलिस ठाण्यात वृत्त लिहेस्तोवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक मिलींदकुमार बहाकर, उप अधीक्षक मंगेश मोहोड, पोलिस निरीक्षक चित्रा मेसरे, कर्मचारी प्रमोद रायपुरे, युवराज राठोड, नीतेश राठोड, महेंद्र साखरे, उमेश भोपते, वेभव जायले, बारबुद्धे, किटकुले यांनी ही कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0