- उत्तर-पश्चिम दिल्ली
नवी दिल्ली,
Yogendra Chandolia-Uditraj : उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे योगेंद्र चंडोलिया आणि काँग्रेसचे उदितराज यांच्यात मुकाबला होत आहे. आकारमानानुसार हा दिल्लीतील सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. 2008 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात 2009 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या कृष्णा तीरथ विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपाच्या मीरा कावंरिया यांचा 1 लाख 91 हजार मतांनी पराभव केला होता. तीरथ यांना 4 लाख 87 हजार तर कावंरिया यांना 2 लाख 95 हजार मते मिळाली. या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या तीन निवडणुकांतील 2 भाजपाने जिंकल्या, तर एक काँग्रेसने. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक निवडणुकीत भाजपाने आपला उमेदवार बदलला आणि तो जिंकलाही.
Yogendra Chandolia-Uditraj : 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उदितराज विजयी झाले होते. उदितराज यांनी आपच्या राखी बिडला यांचा 1 लाख 6 हजार मतांनी पराभव केला होता. उदितराज यांना 6 लाख 29 हजार, तर राखी बिडला यांना 5 लाख 23 हजार मते मिळाली होती. या मतदारसंघाच्या खासदार कृष्णा तीरथ यांना 1 लाख 57 हजार मते घेत तिसर्या स्थानावर राहिल्या.
Yogendra Chandolia-Uditraj : 2019 मध्ये भाजपाने उदितराज यांना उमेदवारी नाकारत हंसराज हंस या गायकाला उमेदवारी दिली. हंस यांनी आपचे गुगनसिंह यांचा साडेपाच लाखावर मतांनी पराभव केला होता. हंस यांना 8 लाख 48 हजार तर गुगनसिंह यांना 2 लाख 94 हजार मते मिळाली होती. आपचे राजेश लिलोठिया 2 लाख 36 हजार मते तिसर्या स्थानावर होते. यावेळी भाजपाने हंसराज हंस यांना या मतदारसंघातून उमेदवारी नाकारली असली तरी पंजाबमधून उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर उदितराज काँग्रेसमध्ये गेले. यावेळी ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. भाजपाचा दलित चेहरा असलेले योगेंद्र चंडोलिया यावेळी प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहे. याआधी त्यांना दोनदा विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला.