सीईओ मंदार पत्की आर्णी तालुक्यात पंचायत समितीत बैठक घेऊन आढावा

25 May 2024 20:53:03
- बोरगाव, दाभडी, लोणी या गावांना भेट

आर्णी, 
यवतमाळ जिल्हा परिषदेचे CEO Mandar Patki मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आर्णी तालुक्याला भेट देऊन पंचायत समितीमधील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक शुक्रवार, 24 मे रोजी घेतली. यावेळी त्यांनी अंतर्गत रस्ता, पांदण पाहणी, घरकुल, जलयुक्त शिवार, नरेगा सार्वजनिक काम आणि आरोग्य केंद्राला भेट दिली. तसेच इतरही विकास कामे, घरकुल, जलजीवन, आरोग्य, बांधकाम या कामांची पाहणी केली. दाभडी, बोरगाव, लोणी येथे त्यांनी विविध कामांची माहिती घेतली व मार्गदर्शन केले. सकाळी 10 वाजता मंदार पत्की आर्णी पंचायत समितीत येऊन बोरगाव व दाभडी येथील जलजीवन अभियानांतील विहिरी व पाईपलाईनचे काम पाहिले. पाईपलाईन, घरकुलांची तपासणी केली. लोणीचे पांदण रस्ते बघितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन औषधांची तपासणी केली. नवीन इमारतीचे काम बघितले.
 
 
y25May-Mandar
 
यावेळी CEO Mandar Patki  मंदार पत्की यांनी सरपंच व नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी रमेश खारोडे, सहायक गटविकास अधिकारी सुधाकर पांडे, जलजीवन अभियंता चव्हाण, मनरेगा, स्वच्छ भारत अभियान पंचायत विभाग व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर आर्णी पंस सभागृहात सर्व विभाग अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक झाली, त्यात आस्थापना, घरकुल, जलजीवन, नरेगा, घरकुल, स्वच्छ भारत अभियान, शिक्षण विभाग, कृषी विभाग, पाणी आदींचा समावेश होता.
 
 
 
CEO Mandar Patki  : जिपच्या पुरवठा, पाटबंधारे व बांधकाम विभागाने कोणती कामे सुरू झाली, किती पूर्ण, अपूर्ण यांची माहिती घेतली. अपूर्ण विकासकामांबाबत काय टंचाई व इतर समस्या आहेत, सिंचनासाठी धडक सिंचन योजनेत किती विहिरी बांधल्या, किती राहिल्या ही माहिती देण्यात आली. योग्य माहिती न दिल्याने पंस कर्मचार्‍यांवर पत्की यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीत गटविकास अधिकारी ईश्वरसिंह बघेल, जिप बांधकाम उपविभागीय अभियंता क्षीरसागर, उपअभियंता स्नेहल पाटील हेही उपस्थित होते. कृषी अधिकारी आनंद बदखल, गटशिक्षणाधिकारी विकास मुळ्ये, आरोग्य केंद्राचे डॉ. निलेश उके आणि सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0