बुलढाणा,
Dnyanganga wildlife sanctuary ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेला करण्यात आलेल्या गणणेत 20 बिबट, 33 अस्वल आढळले निसर्ग अनुभव करताना ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन वनपरिक्षेत्रात 603 वन्यप्राणी आढळून आले आहेत. Dnyanganga wildlife sanctuary ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यजीवांचे नोंद करण्यात येत असते. वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभाग घेता येतो.

Dnyanganga wildlife sanctuary यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात 14 मचाणावर बसून निसर्गप्रेमींना प्राणी गणनेचा आनंद घेता आला. यावेळी एका निसर्गप्रेमींसोबत वन्यजीव विभागाचा एक कर्मचारी सोबत होता. वन्यजीवपासूनच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्राण्यांची नोंद करण्यात आली. Dnyanganga wildlife sanctuary त्यामध्ये बिबट 20, अस्वल 33, रानडुक्कर 177, सायाळ 8, ससा 15, तडस 5, भेडकी 7, निलगाय 165, मोरलांडोर 140, चिकारा 9, हरिण 21 असे एकूण 603 वन्यप्राणी आढळून आले. निसर्ग अनुभव कार्यक्रमात कार्यक्रम राबविण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ दीपेश लोखंडे, आरएफओ विशेष सेवा पी. बी. पाटील व वन्यजीव विभागाचे कर्मचार्यांचा सहभाग होता.Dnyanganga wildlife sanctuary