आजपासून नऊ दिवस तापणार

25 May 2024 09:23:45
नवी दिल्ली,  
NAUTAPA आजपासून नवतपाला सुरवात होत झाली आहे. हवामान खात्याने आज राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसाठी रेड अलर्टसह तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. अंदाजानुसार जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या स्थितीचा अंदाज आहे.
 
 
NAUTAPA
 
नवतपा 25 मे पासून सुरू होत आहे. या दिवशी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. असे मानले जाते की या दिवसात खूप उष्णता राहते. रोहिणी नक्षत्रात सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर कमी होते त्यामुळे पृथ्वीवर सूर्यकिरणांची उष्णता अधिक तीव्र होते. दरम्यान,   नवतपा 2 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. राजस्थानमधील कडाक्याची उष्णता आता आपत्ती ठरत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे येथे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. NAUTAPA आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या बारमेर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमान 48 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. ईशान्येकडील राज्यांबद्दल बोलायचे झाले तर पुढील 7 दिवसांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे (30-40 किमी प्रतितास) वाहण्याची शक्यता आहे सोबत तुरळक पावसाची शक्यता. मात्र, 25 मे रोजी आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD ने केरळ आणि माहेमध्ये पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0