gunpowder factory छत्तीसगडमधील बेमेटारा येथे एका गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या भीषण अपघातानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. ही संपूर्ण घटना बेमेत्रा येथील बेरला ब्लॉकमधील बोरसी गावाजवळ घडली आहे. या भीषण स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : आजपासून नऊ दिवस तापणार