मृगाचा कोल्हा, चित्राची म्हैस शेतकर्‍यांना तारणार

Wardha-Agriculture-Monsson मशागत अंतिम टप्प्यात

    दिनांक :26-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
हिंगणघाट, 
 
 
Wardha-Agriculture-Monsson विज्ञानाने कितीही प्रगती केली असलीतरी संगणक युगातही मृगाच्या पावसाचा अंदाज काढण्यासाठी शेतकरी पंचागाचाच आधार घेतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून पेरणी करतो. Wardha-Agriculture-Monsson खरीप हंगामात त्या-त्या नक्षत्राचे वाहन शेतकर्‍यांच्या जीवनाचे सुख-दुःखाचे चक्र सुरू ठेवते. असा समज आहे. यंदा मृग नक्षत्र कोल्हा या वाहनापासून तर चित्राच्या म्हैस या वाहनापर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकर्‍यांना भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवीत झाली आहे.Wardha-Agriculture-Monsson
 

Wardha-Agriculture-Monsson 
 
मागील चार वर्षांमध्ये अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला. मागीलवर्षी जुनमध्ये समाधानकारक पाऊस झाला. तर, सोयबीन घरात येत असताना झालेल्या अधिक पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. Wardha-Agriculture-Monsson यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकर्‍यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली आहे.
यंदाची नक्षत्रे आणि त्यांची वाहने
दिनांक           नक्षत्र        वाहन
7 जून               मृग         कोल्हा
21 जून            आर्द्रा        मोर
5 जुलै            पुनर्वसू         हत्ती
19 जुलै            पुष्य         बेडूक
2 ऑगस्ट        आश्लेषा     गाढव
16 ऑगस्ट        मघा         कोल्हा
30 ऑगस्ट        पूर्वा         उंदीर
13 सप्टेंबर        उत्तरा         हत्ती
26 सप्टेंबर        हस्त         मोर
10 ऑक्टोबर    चित्रा         म्हैस