गोंदिया-रायपूर गाडी पूर्वीप्रमाणे करा सुरु

जागृती मंच व रेल्वे सल्लागार समिती

    दिनांक :26-May-2024
Total Views |
गोंदिया, 
जागृती विकास gondia- raipur railway मंच गोंदिया व पूर्व रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने गोंदिया ते रायपूर व इतवारी ते गोंदिया रेल्वेगाडी पूर्वीप्रमाणे सुरु करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात रेल्वे अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, गोंदिया ते रायपूर ही रेल्वेगाडी मागील दहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली.
 
 

gondia- raipur railway 
ही गाडी गोंदिया gondia- raipur railway रेल्वेस्थानकावरुन सकाळी 7 वाजता निघून 11 वाजता रायपूरला पोहोचते. त्यामुळे ही गाडी सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी, कर्मचारी व व्यापार्‍यांसाठी सोयीची होती. त्याचप्रमाणे इतवारी ते गोंदिया मेमो रेल्वेगाडी देखील दहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली. ही गाडी देखील प्रवाशांसाठी सोयीची होती. मात्र दोनही रेल्वेगाड्या दहा महिन्यापासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्या सुरु करण्यात याव्यात. तसेच एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांच्या दोन्ही बाजुला सामान्य अनारक्षीत डब्बे उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना छैलबिहारी अग्रवाल, सुरेंद्र शर्मा, सुरज नशिने, दिव्या भगत, प्रफुल्ल जायस्वाल, चंद्रप्रकाश गुप्ता उपस्थित होते.