दहावी (एसएससी) मार्च 2024 परीक्षेचा 10th board results निकाल सोमवार, 27 मे रोजी जाहीर झाला. दहावीच्यापरीक्षेत शिशुविहार मंडळ संचालित महिला विद्यालयातून 134 विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली. यामध्ये डिस्टिंक्शन ग्रेड-41, प्रथम श्रेणी 57, द्वितीय श्रेणी 28 आणि पास ग्रेड 6 एकूण 132 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. यामध्ये महिला विद्यालयातून वेदश्री हेमराज बंड 93 टक्के गुण मिळवून प्रथम स्थान, तर श्रावणी अजय उईके हिने 92 टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले. आरुषी सतीश बढाये, अनघा घनश्याम दरणे व अक्षरा सुरेश वडतकर या तीन विद्यार्थिनींनी 90.40 टक्के मिळवून तृतीय स्थान मिळविले.

तन्वी अजय राऊत 10th board results हिने मराठीत 95 गुण व हिंदी संस्कृतमध्ये 97 गुण प्राप्त केले. कुलश्री सुनीलसिंह मोरे हिने इंग्रजीत 94 गुण प्राप्त केले. अक्षरा सुरेश वडतकर हिने गणित व विज्ञान या विषयांत शाळेतून प्रथम क्रमांक, तर तन्वी प्रशांत घोसे हिने सामाजिक शास्त्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला. टेक्निकल विषयांत अक्षरा वडतकर व श्रावणी उईके यांनी प्रथम स्थान मिळविले. शिशुविहार मंडळाच्या पदाधिकारी, सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी सर्व विद्याथ्यारचे कौतुक व अभिनंदन केले आहे.