वर्धा जिल्ह्यात मुलींचाच बोलबाला

Wardha-SSC result जिल्ह्याचा निकाल 92.2 टक्के

    दिनांक :27-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
वर्धा, 
 
 
Wardha-SSC result राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल आज सोमवार 27 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. Wardha-SSC result दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारत आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूलची साक्षी मनोज गांधी हिने 99.80 टक्के गुण घेऊन नागपूर विभाग तसेच वर्धा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. Wardha-SSC result तर याच शाळेतील सृष्टी अमित राठी हिने 98.40 टक्के, तर स्वरा पंकज जाधव हिने 98.20 टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अनुक्रमे द्बितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. 1 ते 26 मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा पार पडल्या.Wardha-SSC result
  
 

Wardha-SSC result 
 
 
  
जिल्ह्यातील 16 हजार 393 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 16 हजार 221 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत 14 हजार 771 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 7 हजार 525 मुले तर 7 हजार 246 मुलींचा समावेश आहे. यावर्षी जिल्ह्याचा निकाल 92.2 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी 84 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. साक्षी गांधी हिने 99.80 टक्के गुण घेऊन नागपूर विभाग तसेच वर्धा जिल्ह्यातून अव्वल ठरली. साक्षीचे वडील अडते व्यापारी असून आई गृहिणी आहे. पुढे अभियांत्रिकी शाखेतून संगणक अभियंता होण्याचा मानस तिने बोलून दाखवला आहे. नियमित अभ्यास व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे यश प्राप्त केल्याचे तिने सांगितले.
 
 
सरस्वती विद्या मंदिर, इंग्लिश मीडियम हायस्कूलचा निकाल 100 टक्के
वर्धा : सरस्वती विद्या मंदिर, इंग्लिश मीडियम हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला. दर्शन अळसपुरे याने 92 टक्के गुण घेत विद्यालयातून प्रथम आला. तर सिद्धांत क्षीरसागर 90 टक्के द्वितीय, निशा मुटे हिने 85 टक्के गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला. 18 विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले. तर 2 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यशाबद्दल संस्थाध्यक्ष पी. एल. देशपांडे, उपाध्यक्ष मुकुंद पिंपळगावकर, सचिव संजय जलताडे, कोषाध्यक्ष मदन परसोडकर, अनिल निर्मळ, विकास झाडे, अपर्णा हरदास आदींनी अभिनंदन केले. प्राचार्य पंकज नाखले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
 
कृषक इंग्लिश विद्यालयातून तनुश्री अव्वल
आर्वी : उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत कृषक इंग्लिश विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तनुश्री जगदळे हिने 96.60 टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. भक्ती दळवे हिने 95.60 टक्के तर तेजस जयसिंगपुरे याने 95.40 टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे द्बितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. 60 पैकी 47 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कृषक शिक्षण संस्थेचा अध्यक्षा शोभा काळे, कोषाध्यक्ष संदीप काळे, मुख्याध्यापक प्रणिता हिवसे, मुख्याध्यापक विजय डोळस व शिक्षकांनी अभिनंदन केले.
 
 
अग्रगामी हायस्कूलचा 100 टक्के निकाल
वर्धा : पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला. अनुष्का आंबेकर आणि श्रावणी पुनसे यांनी 97 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. इंशात राऊत याने 96.20 टक्के द्वितीय तर प्रक्षिक चाफले याने 96 टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
 
 
भरत ज्ञान मंदिरममधून जान्हवी वैद्य प्रथम
वर्धा : स्थानिक भरत ज्ञान मंदिरमचा निकाल 99.38 टक्के लागला. जान्हवी वैद्य 96 टक्के गुण घेऊन प्रथम आली. तरूण लोखंडे 94.60, आणि मोहित आकरे याने 93.60 टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्बितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. संस्थाध्यक्ष माधव पंडित, उपाध्यक्ष मकरंद पाठक, सचिव अ‍ॅड. संध्या पुरेकर, सहसचिव व्ही. बी. देशपांडे, सदस्य डॉ. खेर, एस. एम. पंडित, एस. व्ही. देशपांडे, डॉ. श्रीरंग पंडित आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य मोना सालोडकर, पर्यवेक्षिका जया देशमुख आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
 
रत्नीबाई विद्यालयातून तनीश चकोले प्रथम
वर्धा : स्थानिक रत्नीबाई विद्यालयाचा निकाल 98.49 टक्के लागला. तनीश चकोले याने 94.20 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आला. राहुल देशकर 92.60 टक्के द्वितीय आणि प्राजक्ता भुरे हिने 91.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे सचिव पवनकुमार रूईया, मुख्याध्यापक देवेंद्र टेकाडे, पर्यवेक्षक शेषराव पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.
 
 
भारत विद्यालयाचा निकाल 93.44 टक्के
हिंगणघाट : स्थानिक भारत विद्यालयाचा निकाल 93.44 टक्के लागला. मधुरा बिरे व टीना सोनटक्के यांनी 92.20 टक्के गुण घेत विद्यालयातून प्रथम आल्या. अथर्व शहाणे व सुमीत ईखार यांनी 91.80 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि श्रद्धा हरले हिने 91.20 टक्के गुण घेत तृतीय आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्याम भीमनवार, संस्थेचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक राजू कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षक निलांक्षी बुरीले, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर आदींनी अभिनंदन केले.
 
 
एस. एस. एम. विद्यालयाचा निकाल 89.06 टक्के
हिंगणघाट : एस. एस. एम. विद्यालयाचा निकाल 89.06 टक्के लागला. गौरी मेले हिने 92.60 टक्के गुण घेत विद्यालयातून प्रथम आली. संपदा ब्रम्हे 91.20 टक्के द्वितीय आणि धनश्री दलाल हिने 88.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
 
 
बन्सीलाल कटारिया हायस्कूलचा निकाल 100 टक्के
हिंगणघाट : स्थानिक बन्सीलाल कटारिया हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला. सर्वेश नांदकरने 94.60 टक्के गुण घेत शाळेतून प्रथम आला. श्रावणी अंबुलकर 93.60 टक्के द्वितीय आणि धनश्री वर्मा हिने 93 टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
 
 
केसरीमल नगर विद्यालयाचा कार्तिक अटेल शहरात प्रथम
सिंदी (रेल्वे): दहावीच्या परीक्षेत केसरीमल नगर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची परंपरा कायम राखली. कार्तिक अटेल याने 94.80 टक्के प्राप्त करून शहरातून प्रथम तर वैभवी चाफले हिने 93.60 टक्के गुण प्राप्त करीत केंद्रातून तृतीय आली. त्याच शाळेचा करण सोनटक्के याने 91.20 टक्के गुण घेऊन विद्यालयातून तृतीय आला. नगर विद्यालयातील 14 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण असून वैभवीला संस्कृत विषयात 100 गुण मिळाले.
 
 
सुशील हिम्मतसिंगका विद्यालयातून अवंती झाडे प्रथम
वर्धा : स्थानिक सुशील हिम्मतसिंगका विद्यालयाचा निकाल 99.41 टक्के लागला. अवंती झाडे हिने 97.20 टक्के गुण घेत विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. मधुरा नांदूरकर हिने 96.40 टक्के गुण घेत द्वितीय तर श्रुती मगर हिने 95.20 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
 
 
सेंट जॉन हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
पुलगाव : येथील सेंट जॉन हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत आपली निकालाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. आर्यन भोंगाडे व प्रतीक्षा थूल यांनी 94 टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम स्थान पटकावले. दिशा भट्टड व रिद्धी पवार यांनी 93.60 टक्के गुण घेऊन द्वितीय स्थान प्राप्त केले. आर्यन येंडे याने 93.20 टक्के गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला.
 
न्यू इंग्लिश हायस्कूलमधून मोनिका चिंचोणे प्रथम
वर्धा : स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलचा दहावीचा निकाल 93.80 टक्के लागला. मोनिका चिंचोणे हिने 93.80 टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. रुचिका बडगुजर हिने 93.60 टक्के गुण घेत द्वितीय तर नूतन भगत हिने 92.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
 
पीयूष मोटघरे, धनू गुळघाणे तालुक्यात प्रथम
गिरड : दहावीच्या परीक्षेत विकास विद्यालय, गिरडचा पीयूष मोटघरे व ज्ञानज्योती इंग्लिश स्कूल, वासीची धनु गुळघाणे यांनी 92.60 टक्के गुण घेत समुद्रपूर तालुक्यात संयुक्तपणे प्रथम आले. तालुक्याचा निकाल 94.17 टक्के लागला असून नऊ विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. संस्कार ज्ञानपीठची संचिता ठाकरे 91.60 टक्के गुण घेत द्वितीय, संस्कार ज्ञानपीठची मृदूला नन्नावरे व ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलची श्रावणी डुकरे हिने 91.40 टक्के गुण घेत संयुक्तपणे तृतीयस्थानी राहिले.
 
महेश ज्ञानपीठचा ओम हिंगणघाट तालुक्यात अव्वल
हिंगणघाट : स्थानिक महेश ज्ञानपीठ हायस्कूलचा दहावीचा निकाल 99.43 टक्के लागला. या शाळेचा विद्यार्थी ओम ठाकरे याने 98 टक्के गुण मिळवून हिंगणघाट तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. तर निर्मित डेकाटे द्वितीय आणि प्रतिक आंबटकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. अंशुल ढगे 95.80 टक्के, समीक्षा बोरकर 94 टक्के, उत्कर्ष गुळघाणे 93.60, स्नेहा वाटमोडे 92.80, श्रुती महाकाळकर 92.60, दामिनी तिमांडे 92.40, कार्तिक देवतळे 92.40, नमन पोरटे 92.40, ऋतुजा तपासे 92.20, आस्था तिमांडे 92.20, स्वरा चौधरी 92, सिद्धांशी कानकाटे आणि ओम वांढरे यांनी 91.80 टक्के गुण प्राप्त केले.
 
 
पी. आर. पाटील इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के
तळेगाव (श्या.पंत) : येथील पी. आर. पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा निकाल 100 टक्के लागला. साहील राघोर्ते याने 94.20 टक्के गुण घेत शाळेतून प्रथम आला. संस्कृती केचे 92.40 टक्के द्वितीय आणि आर्यन पाटील याने 91.60 गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. हिमांशू इरखेडे आणि आचल शेंद्रे या विद्यार्थ्यांनी 90 टक्केच्यावर गुण प्राप्त केले.
 
 
आष्टी तालुक्यातून संस्कृती कोवळे प्रथम
आष्टी : येथील लोकमान्य विद्यालयाचा निकाल 97 टक्के लागला. संस्कृती कोवळे हिने 96.80 टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम आली. तनुजा कुरवाडे 93.80, रिया पांडे 93 टक्के, ओम बुटले 92.40, श्रुती राणे 91.80, खुशी मेहरे 91.80, यश कोवळे 91.60, कोमल खोडके 91.20 आणि मोहिनी खोडे हिने 90.60 टक्के गुण प्राप्त केले.
 
 
मॉडेल हायस्कूलचा निकाल 96.07 टक्के
तळेगाव (श्या. पंत) : येथील मॉडेल हायस्कूलचा निकाल 96.07 टक्के लागला. विद्यालयातून प्रथम क्रमांक स्वरूपा देवघरे 93.40 टक्के, द्वितीय सौम्या पाटील 89.60 टक्के आणि 87 टक्के गुण घेत उन्नती खोडे तृतीय आली.
 
 
विराज भागवत देवळी तालुक्यात प्रथम
देवळी: दहावीच्या परीक्षेत येथील सृजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विराज भागवत याने 96.60 टक्के घेऊन देवळी तालुक्यातून प्रथम आला. तनुजा डाखोळे 96.20 टक्के गुण घेत तालुक्यातून द्वितीय तर यश देवतारे याने 96 टक्केे गुण घेऊन तालुक्यातून तृतीय आला. शाळेचा निकाल 100 टक्के लागला. गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्षा डॉ. श्रद्धा चोरे व सचिव डॉ. प्रशांत चव्हाण यांच्या हस्ते स्व. पंकज चोरे स्मृतीप्रित्यर्थ सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक प्रिया वैद्य, प्राचार्य सीमा वाघमारे, पल्लवी काळे, कीर्ती कामडी, मयूर तेलरांधे आदी उपस्थित होते.
 
 
पुलगावातून श्रावणी गवारले प्रथम
पुलगाव : स्थानिक इंडियन स्कूल ऑफ स्कॉलरची विद्यार्थिनी श्रावणी गवारले हिने 94.60 टक्के गुण घेऊन शहरातून प्रथम आली. शेतकरी कुटुंबातील श्रावणी ही लगतच्या खेड्यावरून शाळेत येत होती. परिश्रम व चिकाटीच्या जोरावर तिने मिळवलेली यश हे नेत्रदीपक आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील व शिक्षकांना दिले आहे.