- सापळा रचून दोघांना अटक
झरी जामणी,
Restricted seeds : तालुक्यात काही एजंट परराज्यातून प्रतिबंधित बियाणे आणून विकत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. या प्रतिबंधित बियाण्यांची खोटी जाहिरात करून शेतकर्यांना विकून शेतकर्यांची फसगत होत होती. झरी तालुक्यातील खातेरा येथील युवक बोगस प्रतिबंधित कापूस बियाणे विकत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली.
Restricted seeds : त्यानुसार पाटण पोलिस ठाण्यांतर्गत झरी जामणी येथे सापळा रचून या इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव प्रज्योत अमोल भेदोडकर असून त्याच्या शोल्डर बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कापूस बियाणे पाकीट आढळून आले. ज्यात कृष्णा गोल्ड बियाणे 1500 रुपये, मोबाईल फोन 12000 रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल 10000 रुपये असा मुद्देमाल जप्त केला. प्रज्योत अमोल भेदोडकर व संकल्प राजेश भोयर यांनी संगनमत करून महाराष्ट्र शासन व शेतकर्याची फसवणूक केली असा गुन्हा नोंद करण्यात आला.
Restricted seeds : ठाणेदार स्वप्नील ठाकरे अधिक तपास करीत आहेत. कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून पाटण पोलिस ठाण्यात संकल्प उर्फ दादू भोयर (वय 20) आणि एक विधी संघर्षग्रस्त मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कृषी अधिकारी सुरेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखा सहपोलिस निरीक्षक अमोल मुडे, योगेश डगवार, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी यांनी पार पाडली.