विशेष लेख
- अॅड. वैभव शिपोरकर
Savarkar-History of India देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो - वीर सावरकर ! यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या, तरी काही लोकांचं यश हे त्यांच्या नशिबाच्या बळावर काहीही न करता अलगद त्यांच्या पदरात पडतं तर काही लोकांच्या हयात असताना तर नाहीच; पण त्यांच्या मरणोपरांतही यश त्यांच्या पदरात पडत नाही. याची अनेक कारणे असू शकतात; पण म्हणून त्या लोकांनी काहीच कर्तृत्व केलं नाही, असं होत नाही. Savarkar-History of India अशा लोकांचं यश पाहण्यासाठी किंबहुना त्यांचं कर्तृत्व पाहण्यासाठी सूक्ष्म दृष्टी असावी लागते. काही वेळेला तर बुद्धीची पराकाष्ठा करावी लागते. याच अनुषंगाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुरुषार्थ पाहायचा असेल आणि तो जाणून घ्यावयाचा असेल किंवा तो अनुभवायचा असेल तर नजरेची व बुद्धीची पराकाष्ठा करावी लागेल. तेव्हा सावरकर काही अंशी समजतील. Savarkar-History of India कारण सामान्य व राजकारणी बुद्धीच्या चाकोरीतून सावरकरांना समजण्याचा जर कुणी अट्टहास करत असेल आणि त्या बळावर कोणी असे जर म्हणत असेल की, त्यांना सावरकर संपूर्ण समजले आहे तर त्यांच्या बुद्धीची केवळ कीव केली जाऊ शकते. कारण सावरकरांचे कर्तृत्व हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.

मग प्रश्न असा पडतो की, जर सावरकर असे होते तर ते आजपर्यंत आम्हाला शाळांमधून किंवा पाठ्यपुस्तकांतून का शिकविण्यात आले नाही किंवा या देशाला त्यांचा सखोल परिचय का करून दिला गेला नाही? या अनुत्तरित प्रश्नांच्या वाटा खूप आहेत, पण उत्तरांचं काय? नवीन पिढीला सावरकर समजायलाच हवे. Savarkar-History of India नवीन पिढीला हे सांगायलाच हवे की, स्वातंत्र्याचा इतिहास हा ‘विनायक दामोदर सावरकर' या नावाशिवाय अपूर्ण आहे. या राष्ट्रवीरावर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात किती अन्याय झाला; किंबहुना सावरकरांनी तो किती सहन केला, याचा इतिहास व सत्यता नव्या पिढीला जर सांगण्यात आली नाही तर आपणसुद्धा अपयशी ठरलो आणि आपणही सावरकरांवर अन्याय करीत आहोत. सावरकरांना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या आयुष्याचे दोन भाग समजून घ्यावे लागतील. Savarkar-History of India सावरकर एक क्रांतिकारक आणि सावरकर एक लेखक, कवी, साहित्यिक असा सावरकरांचा जीवनप्रवास आहे. सावरकर जेव्हा क्रांतिकारक असतात तेव्हा ते वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ‘मित्रमेळा' नावाचा विद्यार्थी गट तयार करतात व वयाच्या २१ व्या वर्षी ‘अभिनव भारत' नावाची क्रांतिकारकांची संघटना स्थापन करतात. सावरकरांची नेतृत्वक्षमता अफाट होती.
चाफेकर बंधू हे त्यांचे प्रेरणास्थान होते. फक्त अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य प्राप्ती होऊ शकत नाही तर इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, अशा क्रांतिकारक विचारांचे ते पुरस्कर्ते होते. सावरकर फक्त क्रांतिकारक नव्हे, तर अत्यंत पुरोगामी विचारांचे किंबहुना तसे जगणारे व्यक्ती होते. समरसता काय असते ही फक्त बोलून नव्हे तर प्रत्यक्ष प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजात रुजवून दाखविण्याची आणि तसे जगण्याची क्षमता असणारे व्यक्तिमत्त्व होते. Savarkar-History of India त्याच प्रेरणेने पतितपावन मंदिराची आधारशिला त्यांनी ठेवली आणि संपूर्ण हिंदू समाज एक ठेवण्यासाठी पराकाष्ठा केली. ‘हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' अशी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिणारे, ‘स्वतंत्रते भगवती' म्हणत मातृभूमीची आराधना करणारे, सागराने वचन भंग केले म्हणून अगस्ती ॠषींना सांगून आचमन करण्याचा प्रत्यक्ष सागरालाच दम देणारे आणि अंदमानमध्ये कुठलेही साधन उपलब्ध नसताना अत्यंत यातना सोसत १० हजार ओव्यांचे ‘कमला' नावाचे महाकाव्य रचणारे आणि प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी पर्यायी शब्द देऊन मराठीतला पहिला शब्दकोश लिहिणारे सावरकर आमच्या नव्या पिढीला माहीतच नाहीत किंवा माहितीच होऊ दिले गेले नाहीत, हे आमचं दुर्दैवच आहे.
Savarkar-History of India सावरकरांनी १८५७ च्या संग्रामाला पहिले स्वातंत्र्य संग्राम म्हटले; तेही आम्हाला शिपाई विद्रोह म्हणून पाठ्यपुस्तकातून शिकविण्यात येते, हा सावरकरांचा अपमानच आहे. पण आम्ही तेव्हाही गप्प होते; आजही गप्प आहोत. २७ वर्षे आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांसाठी लढलेल्या नेल्सन मंडेलांना आम्ही ‘भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देऊ केला. पण आमच्याच भारतात जन्मलेल्या आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या आणि अंदमानच्या कालकोठडीमध्ये काथ्या कुटत व बैलाप्रमाणे कोलू फिरवत अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान असलेल्या विनायक दामोदर सावरकर मात्र या देशात उपेक्षितच राहिले. एकाच जन्मात दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झालेले सावरकर हे भारतातले एकमेव क्रांतिकारक होय. पण सत्तालालसेने अंध झालेल्या आणि काही राजकारण्यांच्या उपनिवेशिक मानसिकतेचे सावरकर बळी ठरले. Savarkar-History of India केवळ प्रखर हिंदुत्ववादी नेता आणि क्रांतिकारक व हिंदू महासभेचे सदस्य म्हणून सावरकरांची हेटाळणी करून त्यांना अपमानित करण्यात आले. केवळ नेहरू-गांधी यांच्या विचारांशी सहमत नाही म्हणून या महापुरुषाला गेली ७० वर्षे राजकीय व सामाजिक अज्ञातवास भोगावा लागला.
स्वतंत्र भारतात राजकीय अटक करून तुरुंगात टाकण्यात आलेले एकमेव क्रांतिकारक म्हणजे सावरकर होय. खऱ्या अर्थाने सावरकर हेच महात्मा होय. या महान आत्म्याने कधीही स्वत:चा विचार केला नाही. देशासाठी स्वत:ची ‘बॅरिस्टर' पदवीसुद्धा नाकारण्यात आलेले सावरकरांच्या वाटेला मात्र उपेक्षाच आली. भारत सरकार ‘भारतरत्न' देऊन कमीत कमी या महात्म्याचा अज्ञातवास कधी संपवणार, याची प्रतीक्षा संपूर्ण हिंदू समाजाला आहे. Savarkar-History of India सावरकरांच्या जयंतीनिमित्त आशा करू या की, भारत सरकार आपल्या तिसऱ्या कारकीर्दीत सावरकरांना त्यांचा सन्मान परत करून त्यांचा अनेक वर्षांचा हा अज्ञातवास संपवेल.
७२७६०७२७५६