बदलत्या निसर्गचक्रास जबाबदार कोण?

climate change-heatwave विषारी वायूचे सतत उत्सर्जन

    दिनांक :28-May-2024
Total Views |
वेध
 
 
- चंद्रकांत लोहाणा
climate change-heatwave संपूर्ण देशामध्ये यावर्षी उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. देशामधील जवळपास सर्वच राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये तर वाढत्या उन्हाने कहर केला आहे. भारत-पाकिस्तानच्या पश्चिमेकडील आंतरराष्ट्रीय सीमेवर काल देशामध्ये सर्वाधिक ५५.४ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. climate change-heatwave मागील १०० वर्षांतील हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या जी तापमानामध्ये वाढ होत आहे, ती खूप जलदगतीने होत असल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणाऱ्या तापमान वाढीचे हे प्रमाण मानवनिर्मित घटनांतून होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा अधिक आहे. climate change-heatwave याचाच अर्थ निसर्गाचा समतोल पार बिघडला आहे. नेमकी हीच बाब वैज्ञानिकांसाठी चिंतेची ठरत आहे. भविष्यामध्ये याचे गंभीर परिणाम मानवास भोगावे लागतील, अशी भीती आहे. मागच्या वर्षीही हवामान बदलाशी संबंधित अनेक संकटांचा सामना करावा लागला.
 
 

climate change-heatwave 
 
 
मागील १०० वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान ०.८ अंशांनी वाढले आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मागील तीन दशकांमध्ये पृथ्वीचे सरासरी तापमान ०.६ अंशांनी वाढले आहे तर समुद्राच्या पातळीमध्ये ३ मिमी एवढी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे समुद्राचे पाणी प्रसरण पावते आणि त्यामधून ही पातळी वाढल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. climate change-heatwave मानवाने विकासाच्या नावावर नैसर्गिक संसाधनांचा विध्वंस केला. त्यामुळे प्रदूषण, जागतिक तापमानामध्ये वाढ, हवामान बदल, ओझोनचा विरळ होणारा थर, नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे होणारे प्रचंड आर्थिक नुकसान मानव आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे. climate change-heatwave जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील ऋतुचक्र व हवामानात फार मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कधी अती पाऊस, ढगफुटी, वादळे, महापूर, थंडी आणि उष्णतेची लाट व रोगराई अशा अनेक नैसर्गिक संकटांना मानवास सामोरे जावे लागत आहे. निसर्गचक्राचा आपला एक नियम आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी जंगले तोडली; परिणामी जैवविविधतेचा ऱ्हास झाला. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले.
 
 
 
 
climate change-heatwave वाढती कारखानदारीही निसर्गाच्या मुळावर उठली आहे. पृथ्वीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानास ‘हरितगृह परिणाम' हाही एक महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे. मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे वातावरणामधील हरितगृह वायूचे प्रमाण हे पृथ्वीच्या नैसर्गिक पातळीपेक्षा अत्यंत जलद गतीने वाढत आहे. याचाच अर्थ पृथ्वीवरील कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन यासारख्या हरितगृह वायूचे पृथ्वीवरील उत्सर्जन अतिशय वाढत आहे. निसर्गतः हरितगृह वायूचे वातावरणातील प्रमाण हे स्थिर असते. climate change-heatwave त्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह परिणामांची तीव्रता स्थिर असते. नैसर्गिक हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे वातावरण ऊबदार बनून सरासरी तापमान १५ अंश सेल्सिअस एवढे राखले जाते. मात्र, वाढते प्रदूषण, मिथेन वायूचे वाढते प्रमाण, कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. औद्योगीकरणामुळे कारखाने वाढले; त्यासोबतच मानवाच्या गरजाही वाढत गेल्या. परंतु, या सर्व बाबी पृथ्वीला हानिकारक ठरत असल्याचे मानव विसरला. कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात मिथेन, कार्बन डाय ऑक्साईड व अन्य विषारी वायूचे उत्सर्जन सतत होत असते.
 
 
 
climate change-heatwave त्यामुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोनच्या थरालाही हानी पोहोचत आहे. सूर्यावरून पृथ्वीवर जी हानिकारक किरणे येतात त्यापासून आपले संरक्षण ओझोनचा थर करीत असतो. परंतु, दिवसेंदिवस हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढत असल्याने पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर कमी होत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अनेक पर्यावरणविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील दुर्मिळ जिवांचा नाश होत असून महासागराच्या आम्लीकरणाची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. climate change-heatwave मानव निसर्गाच्या मुळावर उठल्याने निसर्गाच्याही सहनशीलतेचा अंत झाला. झाडाच्या अमाप कत्तलीने जंगले नष्ट झाली. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत झाडांची संख्या वाढायला हवी, हे महत्त्व आम्ही कधीच ओळखले नाही. स्वार्थी मानवाने निसर्गास निव्वळ ओरबाडण्याचे कार्य केले. त्याचे परिणाम आम्ही आज भोगत आहोत.
 
 
९८८१७१७८५६