पणत्या तेवताहेत...

girls in board exams बोर्डात राज्यात मुलींची बाजी

    दिनांक :29-May-2024
Total Views |
वेध
 
- विजय निचकवडे 
 
girls in board exams मानवी बुद्धिमत्तेतील लैंगिक फरक हा कायम संशोधन आणि सिद्धांतांमध्ये अडकून असलेला विषय आहे. स्त्री-पुरुष असा भेद करून अधिक बुद्धिवान कोण? हा निष्कर्ष काढण्यापर्यंत अजून कुणी पोहोचले नाहीत आणि कदाचित पोहोचणारही नाहीत. girls in board exams पण मागील कालावधीत झालेल्या विविध शालेय परीक्षा आणि त्यांचे आलेले निकाल जर ‘मुलीच हुश्शार' असे सांगत असतील तर या यशामागची कारणे शोधायला नकोत का? आमचा वंशाचा दिवाही मागे नाहीच; पण पणत्या जर सतत तेवत राहून आपले वेगळेपण सिद्ध करीत असतील तर चांगलं ते ग्रहण करायला हरकत काय? आज स्त्री-पुरुष भेद आम्ही मानत नाहीत. girls in board exams अगदी कठिणातील कठीण ठिकाणी स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे आज दिसते. वंशाचा दिवा म्हणून मुलांना डोक्यावर घेऊन मिरवण्याची आणि त्यांचे कौतुक करण्याची परंपरा नक्कीच कमी झाली आहे. हेही वाचा : ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!'
 
 
 
 
girls in board exams
 
 
 
girls in board exams काही ठिकाणी आजही अशिक्षितपणाच्या कारणाने ‘नकोशीङ्कसारख्या जन्माला येतात, हा भाग निराळा! हा भेदभाव मिटविण्यासाठी शासन स्तरावरून नाना विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यांना यश किती येते, हे मात्र सांगणे कठीण आहे. काही दिवसांपूर्वी बारावी परीक्षेचा निकाल लागला आणि २७ रोजी दहावीच्या परीक्षेचाही निकाल आला. सर्व वर्तमानपत्रांमध्ये ‘राज्यात मुलींची बाजी' याच बातम्या झळकल्या. girls in board exams जे बारावीच्या निकालानंतर वाचायला मिळाले, तेच दहावीनंतरही! नक्कीच मुलींनी घेतलेली आघाडी आणि त्यांनी संपादित केलेले यश कौतुकास्पद आणि मातृशक्तीचा सन्मान करणारेच आहे. मग मुलांनी काहीच केले नाही, असे म्हणायचे का? तर नाही. पण ज्यांच्यावर आमच्या अपार अपेक्षा आहेत. ज्यांच्याकडे आजही ‘वंशाचा दिवा' म्हणून पाहण्याची मानसिकता या समाजात रूढ आहे, अशा दिव्यांनी नक्कीच विचार करायला नको का? girls in board exams  खरं तर बुद्धिमत्तेच्या बाबतीत लैंगिक फरक नाही, हे मानसशास्त्र सांगते.
 
 
 
हेही वाचा : वर्धा ब्रेकिंग...कारंजा घाडगे येथे धावत्या ट्रॅव्हला आग डॅनियल व्हॅचर आणि सुजान डी. व्हॉयर यांनी केलेल्या मेटा विश्लेषणात शैक्षणिक कामगिरीवरील लैंगिक फरकाच्या संदर्भात अनेक संशोधने झाली; मात्र कुठेही लैंगिकतेच्या आधारे बुद्धिमत्तेचे मोजमाप कमी-अधिक असल्याचे अधिक प्रमाणात स्पष्ट झाले नाही. स्त्री-पुरुषांच्या सरासरी बौद्धिक गुणांकात कोणतेही लक्षणीय फरक आढळून आले नाहीत. girls in board exams मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये असा फरक आढळून आला नसला, तरी २० व्या शतकापूर्वीपर्यंत पुरुष हे बौद्धिकदृष्ट्या स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असा सामान्य समज होता. जो आज राहिल्याचे दिसत नाही. जर लैंगिकतेच्या आधारे बौद्धिक क्षमतांमध्ये भेद केला जाऊ शकत नसेल तर मागील काही वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या निकालांमध्ये आघाडीवर असलेल्या मुलींच्या यशामागील गमक शोधणे गरजेचे नाही का? मुली आघाडीवर आहेत, याचा अर्थ मुले ढेपाळली असा नक्कीच होत नाही. प्रत्येक जण आपापल्यापरीने यश संपादन करतो. त्यात अधिक भर घालण्यासाठी काही आमच्या पणत्या मार्गदर्शक ठरत असतील तर त्याचा फायदा नक्कीच करून घ्यायला हवा.
 
 
 
girls in board exams हे करताना मुलींच्या यशामागील कारणे शोधणे गरजेचे आहे. आज शिकवण्यांचे प्रस्थ प्रचंड वाढले आहे. प्रत्येकच पालक आपल्या पाल्यांना शिकवणीला पाठवतो; नव्हे शिकवण्या प्रतिष्ठेचाही विषय झालेला आहे. अशावेळी शिकवणीला जाणारी आपली पाल्ये तिकडे जाऊन काय दिवे लावतात, याचा अभ्यास पाल्यांकडून व्हायलाच हवा. अभ्यासाच्या बाबतीत मुलींमध्ये असलेल्या सातत्याचा कदाचित मुलांमध्ये अभाव असू शकतो. girls in board exams टेक्नोसॅव्ही झालेली आजही पिढी माध्यमांच्या आहारी गेल्याचे जाणवते. ही माध्यमेही दिव्यांचा प्रकाश सर्वत्र पसरविण्यासाठी कारणीभूत असावी. मुलांना बाहेरच्या वातावरणाची पडलेली भुरळ, गेqमग यासारख्या गोष्टी जर अभ्यासापासून दूर करीत असतील तर नक्कीच निकाल कोणताही आला तरी मुली मुलांपेक्षा हुश्शारच असतील, यात शंका नाही.
 
 
या सर्व गोष्टींसोबतच मुलांमध्ये असलेली समाजाबद्दल आणि मोठ्या व्यक्तींची आदरयुक्त भीती हेसुद्धा मुलींच्या यशामागे कारण म्हणून पाहिले जाऊ शकते. आजचा युवा राहणीमान आणि मौजमजा यातच समाधान मारणारा आहे. नक्कीच मुलीही यात मागे नाहीत. परंतु अभ्यासातील सातत्याच्या बाबतीत कुठेतरी आम्ही कमी पडतो आहे, हे समजायलाच हवे! girls in board exams आलेले निकाल सकारात्मकतेने घेत भविष्यात जे चांगले ते पणत्यांकडून स्वीकारल्यास नक्कीच राज्यात ‘मुलांची बाजी' असे वाचले जाऊ शकेल, नाहीतर पणत्या तर तेवत राहणारच आहेत ना?
९७६३७ १३४१७