कोहलीच्या स्ट्राइक रेट बद्दल आगरकर काय म्हणाले?

03 May 2024 11:43:26
मुंबई,   
Virat Kohli Strike Rate बीसीसीआईने मंगळवार, 30 एप्रिल रोजी टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा केली होती. गुरुवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात यासंदर्भातील पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा सहभागी झाले होते. यावेळी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देण्यात आली. कोहलीच्या बचावात उतरला एबी डिव्हिलियर्स

Virat Kohli Strike Rate
 
12 वर्षांनंतर बनला कुबेर योग...या राशींचे एक वर्ष आनंददायी  पत्रकार परिषदेत अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांना विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न विचारल्यावर रोहित शर्मा हसायला लागला. त्याचवेळी अजित आगरकर यांनी प्रत्युत्तर दिले. Virat Kohli Strike Rate अजित आगरकर म्हणाले की, विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटबाबत सध्या काहीही विचार केला जात नाही. तो अप्रतिम फॉर्ममध्ये आहे.  कोविशील्डमुळे माझा दोन्ही मुलींचा मृत्यू!
आगरकर पुढे म्हणाले, कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत आम्ही सध्या काहीही विचार करत नाही. तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येही तो सातत्याने धावा करत आहे. अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही कोहलीच्या स्ट्राईक रेटकडे लक्ष देण्याचा विचारही केला नाही. विश्वचषकासारख्या स्पर्धेत वेगळ्या प्रकारचे दडपण असेल, तिथे अनुभव उपयोगी पडेल. विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली होती. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 118.60 होता. त्यामुळे विराट कोहलीवर बरीच टीका झाली होती. यानंतर, त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 159.09 च्या स्ट्राइक रेटने 44 चेंडूत 70 धावांची नाबाद खेळी खेळून चोख प्रत्युत्तर दिले.
Powered By Sangraha 9.0