झेलम एक्स्प्रेसमधील बॉम्बची अफवा...

03 May 2024 11:58:53

ezpress
 
 
भोपाळ,
Jhelum Express शुक्रवारी सकाळी झेलम एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची बातमी आल्यानंतर भीती पसरली होती. यानंतर ट्रेनला राणी कमलापती स्थानकावर थांबवण्यात आले आणि लगेचच आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकांनी ट्रेनच्या आत शोध घेण्यास सुरुवात केली. ट्रेनच्या प्रत्येक बोगीची तपासणी करण्यात आली. शोधासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र, शोधमोहिमेदरम्यान ट्रेनमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही. नंतर ट्रेन पुढे पाठवण्यात आली. सुमारे 35 मिनिटे ट्रेन राणी कमलापती स्थानकावर उभी होती. बॉम्बच्या माहितीच्या ईमेलमुळे बुधवारी दिल्लीतील अनेक शाळांमध्ये घबराट निर्माण झाली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली होती.  12 वर्षांनंतर बनला कुबेर योग...या राशींचे एक वर्ष आनंददायी
Powered By Sangraha 9.0