उत्साहावर उन्हाळ्याचे विरजण !

Election 2024-Politics डोके वर काढण्याची संधी

    दिनांक :03-May-2024
Total Views |
अग्रलेख
 
Election 2024-Politics लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाच्या टक्केवारीवरून निवडणूक निकालाचे भविष्य वर्तविण्याचे आडाखे आता बदलावयास हवेत. मतदानाच्या टक्केवारीवरून मतदाराच्या मानसिकतेचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार निकालाचा कौल कोणाच्या दिशेने झुकणार याचे अंदाज बांधणे या पठडीबाज रीतीला आता रामराम करावा लागणार असून, मतदानाच्या टक्केवारीशी अन्य काही कारणेही जोडली गेलेली असतात का, याचा नव्याने शोध घेण्याची वेळही आली आहे. Election 2024-Politics गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला उन्हाचा कहर, हे याचे खरे कारण आहे. नैसर्गिक आपत्तींची चाहूल लागली की हवामान खाते किंवा सरकारी यंत्रणा नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देतात. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा एक इशाराही यामध्ये असतो. Election 2024-Politics आता मतदानासाठी घराबाहेर पडणे ही केवळ कोणा व्यक्तीची किंवा कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण देशाची आणि देशाच्या भविष्याचीही गरज आहे याचे भान रुजण्याची गरज पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची टक्केवारी पाहता अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मतदानासाठी मतदार घराबाहेर न पडल्याने मतदानाचे प्रमाण घटते आणि मतदानाची टक्केवारी घसरते हे कमी मतदानाचे ढोबळ कारण असल्याचे म्हटले जाते, आणि तेच खरेदेखील आहे.Election 2024-Politics
 
 
 
Election 2024-Politics
 
 
Election 2024-Politics पण मतदानाकरिता मतदार घराबाहेर का पडला नसावा याची राजकीय किंवा बिगर राजकीय कारणे शोधताना मात्र त्याला आपल्या आपल्या राजकीय पूर्वग्रहाच्या तर्काची आणि पठडीबाज अंदाजांची फोडणी देऊन देशाच्या राजकीय भविष्याचे पदर उलगडण्याचे प्रकार मात्र हास्यास्पद म्हणावे लागतील. या वेळी पहिल्या दोन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा गवगवा सुरू होताच सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील अनेकांना असेच काहीसे आनंदाचे भरते येताना दिसू लागले. सत्तारूढ आघाडीचा मतदार हा कटिबद्धतेने मतदानासाठी बाहेर पडतो आणि मतदानाची टक्केवारी कमी झाली म्हणजे हा मतदार घराबाहेरच पडला नाही, असा शोधही काहींना लागला. Election 2024-Politics प्रत्यक्षात, उन्हाळ्याच्या तीव्र झळा हे मतदान कमी होण्याचे मुख्य कारण असून कमी टक्केवारीमागे असे कोणतेही राजकीय कारण असावे किंवा सत्ताधारी आघाडीशी कटिबद्ध असलेला मतदारच घराबाहेर न पडल्याने मतदान कमी झाले असावे, असे तर्क चुकीचे ठरतात. उलट, मानसिकदृष्ट्या एखाद्या विचाराशी बांधिलकी मानणारा आणि देशाच्या भविष्याविषयी गांभीर्याने विचार करणारा कोणताही मतदार अशा तात्कालिक प्रकारांची तमा न बाळगता मतदानाकरिता बाहेर पडतो, असे मानले तर जी काही टक्केवारी पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानातून समोर आली आहे, त्यापैकी मोठा हिस्सा अशा गंभीर आणि प्रामाणिक मतदारांच्या मतदानाचा असावा, असे मानता येईल.Election 2024-Politics
 
 
 
अर्थात, मतदानाच्या टक्केवारीचा आणि निवडणुकांच्या निकालाचा प्रत्यक्ष संबंध असल्याचे किंवा कोणत्या टक्केवारीवरून कोणाचा विजय किंवा पराजय होणार, याचे आडाखे बांधण्याचे आजवरचे पठडीबाज प्रकार तंतोतंत खरे ठरल्याचे याआधी पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. ज्याप्रमाणे निवडणूकपूर्व अंदाज किंवा एक्झिट पोलसारखे प्रकार अथवा वेगवेगळी सर्वेक्षणे करून वर्तविले गेलेले भविष्य यांचा प्रत्यक्ष निकालाशी फारसा जवळचा संबंध असतोच असे नाही, तसेच, टक्केवारीच्या आकड्यांवरून निकालाचे भविष्य वर्तविण्याच्या प्रकाराचादेखील निकालाशी संबंध जोडणे फारसे तंतोतंत नसते. Election 2024-Politics अर्थात, याची शहानिशादेखील निकालानंतरच करावयाची असल्याने व याआधीच्या प्रत्येक निवडणुकीतील कोणत्याही निकालाशी त्याआधीच्या अंदाजांची शहानिशा केल्यावर जे निष्कर्ष निघाले आहेत, ते पाहता, नव्या अंदाजांचेही तेच होणार असून निकालानंतर मात्र, कमी टक्केवारीचे सारे खापर तीव्र उन्हाळा या एकमेव कारणावर फोडावे लागणार, असे दिसू लागले आहे. खरे म्हणजे, हवामान बदलाच्या अनेक कारणांमुळे गेल्या काही दशकांपासून पृथ्वीचे तापमान आणि ऋतुमानदेखील पुरते बिघडले असून परंपरागत पद्धतीने हवामानाचे अंदाज वर्तविणेदेखील आजकाल अवघड होऊ लागले आहे. Election 2024-Politics कोणे एके काळी, भेगाळलेल्या शेताच्या कोपऱ्यावर बसून तापलेल्या जमिनीचे चटके सोसत आणि घामाने थबथबलेल्या कपाळावर हाताची सावली धरत आभाळाचा कानाकोपरा न्याहाळून पावसाळी ढगाचा किंवा हवामानातील बदलाचा वेध घेण्याची पारंपरिक पद्धत होती.
 
 
 
ती आता मोडीत निघाली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या वेधशाळांनादेखील हवामानातील नवे बदल अनेकदा हुलकावण्या देऊ लागल्यापासून हे अंदाज छातीठोकपणे वर्तविण्याचे धाडस फारसे केलेच जात नाही. भविष्यातील हवामान बदलाच्या शक्यतांवर आणि त्यामुळे घडणाऱ्या बदलांच्या गृहितांवर आधारित सावधगिरीचे सल्लेदेखील सावधपणे देऊनच हवामानाचे अंदाज सुरक्षितपणे वर्तविले जाऊ लागल्याने, वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे तसे घडेलच याची खात्री नसल्यामुळे वारंवार सुधारित अंदाज वर्तविणे भाग पडत असते. Election 2024-Politics केवळ, उन्हाळा तीव्र आहे म्हणून शक्यतो घराबाहेर न पडता वातानुकूलन यंत्रे, पंखे qकवा शीतकरण यंत्रांच्या सान्निध्यात बसून दिवस वाया घालविणे हा सुरक्षित जगण्याचा उपाय मानला, तर मात्र ती घोडचूक ठरेल, असे काही इशारे आता पुढे येऊ लागले आहेत. कारण, उन्हाळ्याचे आणि उष्णतेच्या तीव्र चटक्यांचे परिणाम केवळ आरोग्यावरच नाही, तर कार्यक्षमतेवर आणि मानसिकतेवरही होत असतात, हे पाहता, सर्वाधिक गरजेच्या आणि अत्यावश्यक कामांच्या यादीत मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्य किंवा जबाबदारीस प्राधान्यक्रमात कोणते स्थान द्यावे, याचा विवेकाने विचार करण्याच्या क्षमतेचीदेखील उन्हाळ्यामुळे कसोटी लागणार आहे. Election 2024-Politics याआधीही उन्हाळ्याच्या हंगामात देशात उष्णतेच्या लाटा येत होत्या. यंदाच्या लाटांचे तडाखे त्याहून अधिक तीव्र असतील, असा अंदाज हवामान खात्याने गेल्या मार्चमध्येच दिला होता. देशाच्या विविध भागांत कमाल तापमानाची विक्रमी नोंद होण्याची शक्यताही वर्तविली गेली होती.
 
 
 
अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे ओढवली नसेल एवढी जीवितहानी या तापमानवाढीमुळे जगाला पाहावी लागण्याची भीतीदेखील वर्तविली जात आहे. अशा लाटेचा भीषण तडाखा याआधी भारताच्या एका भागास सुमारे नऊ वर्षांपूर्वी बसला होता, आणि त्या लाटेने जवळपास अडीच हजार बळी घेतले होते. हे पाहता, आता मे महिन्यातील ऐन उन्हाळ्याच्या तीव्र लाटेस सामोरे जाण्याकरिता काही उपाययोजना करण्याची गरज ओळखावयास हवी. Election 2024-Politics केवळ मतदानाची टक्केवारी टिकविणे qकवा अशा स्थितीतही जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे याकरिता मानसिकता रुजविणे महत्त्वाचे आहेच, पण प्रत्यक जिवाची सुरक्षितता त्याहूनही महत्त्वाची आहे. याकरिता संपूर्ण साधनसंपत्ती पणाला लावावी लागेल. बाकी उन्हाळ्याच्या काळात निर्माण होणाèया वीजटंचाई, पाणीटंचाईसारख्या समस्या यंदा अधिक उग्र आहेतच, दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट तर तीन महिन्यांपूर्वीच स्पष्टपणे उमटलेदेखील होते. निवडणुकीच्या गदारोळात या संकटांची चर्चा फारशी होत नसली, तरी ती संकटे सरलेली नाहीत, उलट दबा धरून डोके वर काढण्याची संधी शोधत आहेत, याचे भानही असणे गरजेचे आहे.Election 2024-Politics
 
 
 
उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे ज्याप्रमाणे तीव्र दुष्काळ पडतात, तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीसारखी भीषण संकटेही उद्भवतात, असा जिनेव्हामधील पर्यावरणविषयक जागतिक हवामान संशोधन केंद्राचा अहवाल आहे. २०२३ मधील जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, २०११ ते २०२० हे दशक जमीन आणि महासागर या दोहोंकरिता सर्वाधिक उष्ण दशक ठरले होते. Election 2024-Politics या काळात जगभरातील हिमनद्या वर्षागणिक सरासरी १ मीटरने वितळल्या, समुद्राची पातळी वर्षाकाठी साडेचार मिलिमीटरने वाढली, समुद्राच्या पृष्ठभागावरील उष्णतेचे प्रमाण साठ टक्क्यांनी वाढले, आर्क्टिक समुद्रातील बर्फाचा विस्तार सरासरी ३० टक्क्यांनी घटला होता. हे सारे भयानक तर आहेच, पण ही तर केवळ सुरुवात आहे. जाळणाऱ्या उष्णतेपासून बचाव करायचा असेल, तर ज्वलंत कृतिशीलता दाखवायला हवी, कारण पुढील पाच वर्षांचे जगभरातील सरासरी तापमान गेल्या पाच वरून कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. संकटाने दिलेला हा इशारा राजकारणापलीकडच्या तर्कांपेक्षा बरेच काही सांगणारा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.